रवी गावातील जनता पितात विहीरीतील अशुद्ध पाणी #jantechaawaaz#news#portal#

62
प्रतिनाधी//

गावातील नागरिक महिलांनी दिली गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष दिलीप घोडाम यांच्या नेतृत्वात तहसील कार्यालयाला धडक

तहसीलदार श्रीहरी माने यांनी दिले विहीरीतील पाणी शुद्धीकरणासह विविध समस्या सोडविण्याचे आश्वासन











:-आरमोरी तालुक्यातील रवी हे गाव अरसोडा ग्रामपंचायत मध्ये समाविष्ट होते परंतु गेल्या पाच वर्षांपूर्वी आरसोड आहे गाव आरमोरी नगरपरिषद मध्ये समाविष्ट झाल्याने रवी ह्या गावाचे अजून पर्यंत कोणत्याही ग्रामपंचायत ना नगरपरिषद यामध्ये समाविष्ट न झाल्याने संपूर्ण गाव गेल्या पाच वर्षापासून विकासापासून वंचित असताना गेल्या दोन वर्षांपूर्वी रवी गावांमध्ये पंधरा वित्त आयोगामधून गावातील एका विहिरीसमोर हाय मास लाईट लावल्याने रात्रीच्या वेळी लाईटावर येणारे किडे हे सरळ सरळ विहिरीमध्ये पडत असल्याने या पिण्याच्या पाण्याच्या विहिरीत संपूर्ण किडे पडल्याने येथील पाणी पूर्णतः

 अशुद्ध झालेला आहे तसेच प्रायव्हेट बोरवेल मधून पाणी घेत आहेत परंतु सदर बोरवेल मधील पाणी सुद्धा पिण्यायोग्य नाही पावसाळ्याच्या दिवसात दूषित पाणी पिल्याने येथील जनता बिमार पडून गंभीर आज राहण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे विहिरीतील पिण्याच्या पाण्याचे उपसा करून तात्काळ ब्लिचिंग पावडर वापरून पाणी पिण्यायोग्य करण्यात यावे तसेच रवी हा गाव ना नगरपरिषदेमध्ये समाविष्ट करण्यात 

आला नाही ना ग्रामपंचायत मध्ये समाविष्ट करण्यात आले नाही फक्त अधिसूचना निघाली आहे आता काही दिवसात नगरपरिषद मध्ये समाविष्ट होणार असेच आश्वासन गेल्या दोन-चार महिन्यापासून सुरू आहेत परंतु अजून पर्यंत हालचाल काय दिसत नाही त्यामुळे रवी या गावातील विहिरी जवळील स्टेट लाईट मुळे विहिरीतील पाण्यात किडे पडत असल्याने विहिरीतील अशुद्ध पाणी शुद्धीकरण करून विहिरीजवळील स्ट्रीट लाईट हटवून दुसऱ्या ठिकाणी लावण्यात यावे यासह गावातील सर्व समस्या तात्काळ सोडवण्यात यावे 

या मागणीसाठी गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष दिलीप घोडाम यांच्या नेतृत्वात रवी येथील नागरीक व महीलानी तहसिलदार कार्यालयाला धडक देऊन तात्काळ समस्या सोडविण्यासाठी तहसिलदार श्रीहरी माने यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी तहसीलदार श्रीहरी माने यानी प्रश्न विचाराधिन घेऊन उध्याच विहीरीतील अशुद्ध पाणी शुद्धीकरण्यासाठी काम मार्गी लाऊन लवकरच विहीरी समोरील हाय माय लाईफ हटऊन दुसऱ्या जागी लावण्यासाठी विज वितरणाला सुचना देण्यात येईल तसेच गावातील खंब्याना पावसाचे दिवस असलेमुळे लाईट लावण्यासाठी उपायोजना करु असे आश्वासन दिले.

यावेळी  शिवदास चौके,प्रशात शिलार, नंदलाल शिलार,दिनकर कोवासे,ताराचंद कामते,शामसुंदर सावसागडे,पपिता मरापा, घनश्याम मरापा,बम्हदास तामसटवार,तिथपाल दिघोरे,गुड्डी शेलार,उर्मिला मरापा,कांता सावसागडे,सारिका पावसाकडे, संगीता कामटे,संगीता शिलार, सपना मरापा,वैशाली दिघोरे, कलका तामसटवार,रुंदा कामते , सिंधू भुते, रंभाबाई कामठे, 

चंद्रकांत कला कामते लता तामसटवार,मनुषा तामसटवार गोपीका कामथे देवला चौधरी शुभांगी शिलार नंदिका शीलार रंजना मरापा देवका कामथे शालू कामथे छबिला सावसागडे यांसह मोठ्या प्रमाणात नागरिक व महीला उपस्थित होते.