माजी जि प अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम यांचा पुढाकार
अहेरी:-* शासनाने काही विभागात रिक्त पदे भरण्याचा निर्णय घेतला असून यात पेसा अंर्तगत समाविष्ठ बेरोजगार युवक,युवतींना मोठी संधी उपलब्ध झाली आहे.मात्र,पेसा प्रमाणपत्रासाठी बेरोजगार युवक,युवतींना अनेकदा कार्यालयीन चकरा मारूनही प्रमाणपत्र मिळत नसल्याने
माजी जि प अध्यक्ष तथा सिनेट सदस्य भाग्यश्री ताई आत्राम यांनी पुढाकार घेतल्याने आता पेसा प्रमाणपत्राची मोठी अडचण दूर झाली आहे.
सध्या शासनाने तलाठी व वनरक्षकांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे.यात पेसा गावातील बेरोजगार युवक युवतींना रोजगाराची मोठी संधी उपलब्ध झाली.मात्र,मागील काही दिवसापासून नगरपंचायत कार्यालय मार्फत पेसा प्रमाणपत्र मिळत नसल्याने या बेरोजगार युवक,युवतीसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला होता.ही अडचण दूर करून त्वरित पेसा प्रमाणपत्र देण्यासाठी बेरोजगार युवक,युवतींनी नुकतेच माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री ताई आत्राम यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.
बेरोजगार युवक,युवतींची ही अडचण लक्षात घेता ताईंनी अहेरी उपविभागातील नगर पंचायतींच्या मुख्याधिकारी यांना भ्रमणध्वनी द्वारे संपर्क करून पेसा अंतर्गत समाविष्ठ गावातील बेरोजगार युवक,युवतींना त्वरित प्रमाणपत्र देण्याबाबत सविस्तर चर्चा केले.त्यामुळे पेसा प्रमानपत्राबाबत सर्वात मोठी अडचण दूर झाल्याने युवक,युवतींनी ताईंचे आभार मानले आहे.विविध विभागातील रिक्तपदे भरण्यासाठी घेतल्या जाणाऱ्या परीक्षेसाठी आता बेरोजगार युवक,युवतींना अर्ज करता येणार आहे.