प्रतिनिधी//
मुख्य संपादक तथा संचालक // सुरेश मोतकुरवार इंडियन दस्तक न्यूज नेटवर्क
#indianbastak#onlinenewsp ortal#social#education#political#enter tainment#crime
‘महाभारत कथा’ कार्यक्रमाला केली आर्थिक मदत.
सिरोंचा तालुक्यातील नडीकुडा ग्रामपंचायत येथील स्थानिक गावामध्ये “महाभारत कथा” कार्यक्रम आयोजित करण्यासाठी आर्थिक प्रश्न निर्माण झाला होता.
त्यावेळी स्थानिक नागरिक व गावातील युवा वर्गानी अहेरी इस्टेटचे राजे,माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव महाराज यांची भेट घेऊन त्यांना आपली ‘महाभारत कथा’ कार्यक्रम घेण्यासाठी आर्थिक समस्या त्यांच्या समोर मांडली,त्यावेळी दानशूर राजे अम्ब्रिशराव महाराज यांनी त्यांची आर्थिक समस्या जाणून घेत नडीकुडा ग्राम वासीयांना आपल्या स्थानिक कार्यकर्ते यांच्या माध्यमातून आर्थिक मदत केली.
त्यावेळी समस्त नडीकुडा ग्रामवासीयांनी राजे साहेबांचे मनःपूर्वक आभार मानले..
“महाभारत कथा” हा कार्यक्रम मोठ्या भक्ती भावाने 13-05-2024 ते 19-5-2024 पर्यंत सहा दिवस मोठ्या उत्साहात होणार आहे.
यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष शंकर नरहरी,भाजपा ज्येष्ठ कार्यकर्ता अब्दुल रहीम भाई,सदनपू लचन्ना,कोत्तापल्ली राजन्ना, तालुका महामंत्री सीतापती गट्टू,श्रीधर आनकरी,तालुका उपाध्यक्ष चंद्रन्ना सदनपू,बुथ प्रमुख कोत्तापल्ली महेश,संतोष दुर्गम तसेच महाभारत कथेतील पात्र धारण केलेले आणि नडीकुडा गावातील नागरिक,युवा वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.!