रानडुकराच्या हल्ल्यात दुसरी महीलाही गंभीर जखमी

463

प्रतिनिधी//

अहेरी : तालुक्यातील वांगेपल्ली ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या किस्टापुर येथील अनसूर्या सतीश भोयर किस्टापुर रहिवासी असून त्यांच्या पतीचे निधन झाल्याने त्यांना एक मुलगी व एक मुलगा असून पोटाची खळगी भरण्यासाठी व्येंकटरावपेठा कटरापेटा येथे तेंदूपत्ता हंगाम सुरू झाल्याने स्वतःची माहेर असल्याने तेंदूपत्ता तोडाईसाठी व्येंकटरावपेठा येथे आली होती.

आज सकाळी तेंदूपत्ता तोडाईसाठी गेले असता तिच्यावर रानडुक्कराने हल्ला केल्याने या हल्ल्यात ती गंभीर जखमी झाली आहे.तिला अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.तिच्यावर उपचार सुरू आहे.