एटापल्ली: वार्ड क्रमांक १४मध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग ह्यांच्या नियंत्रणात सिमेंट काँक्रीटचे बांधकाम निविदा नुसार मंजुर करण्यात आले व कंत्राट नुसार कामाचा दर्जा चांगल्या प्रतीचा अपेक्षित आहे. परंतु कंत्राटदाराने सदर रोड बांधकामात रेती ऐवजी नाल्याची पदरी वापरली व ही वापरलेली बदली ही माती मिश्रित असुन हीला पकड राहात नसल्यामुळे बांधकाम हे अत्यंत निक्रुष्ट दर्जाचे झालेले आहे व ह्याची रितसर तक्रार वार्डातील नागरिक उपअभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग एटापल्ली ह्याचेकडे केलेली आहे. शिवाय अंदाजपत्रक नुसार रोडची उंची कमी उभारली असून क्युरींगसुध्दा झालेली नाही.
ह्या रोडच्या बांधकामात वापर करण्यात सलाख ही चित्रात असल्याप्रमाणे उभ्या जोडणी केलेल्या असुन किमान २फुट अंतरावर वापर करण्यात आले आहे.
एवढ्या मोठ्या प्रमाणात भ्रष्ट असतांना सबंधित अभियंता झोपेत आहे काय?
ह्या निक्रुष्ट दर्जाचे रोड बांधकामाची चौकशी उच्च स्तरावरून दर्जा व नियंत्रण यांचे माध्यमातून व्हावी अशी वार्ड क्रमांक १४ आनंद नगरवासियांनी केली आहे.