शेतकऱ्यांच्या धान पिकाची मोठ्या प्रमाणात नुकसान तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावे
गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष दिलीप घोडाम यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांची जिल्हाधिकारी यांच्या कडे निवेदनातून मागणी.
आरमोरी – तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाच्या पाण्याने पळसगाव परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचल्यामुळे धानाचे रोपटे व रोवणी नट होऊण शेतकऱ्यांनी दुबार पेरणी केली काहीनी धान परे शोधाशोध करुन नव्याने रोवणी केली व झालेल्या नुकसानीला समोर जाऊन त्यात शेतकरी सावरुण असताना गेल्या तीन दिवसांपासून सततच्या पावसाच्या पाण्यामुळे पळसगाव जोगीसाखरा रस्तेवरील व पाथरगोटा जोगीसाखरा नाल्याला पुर आल्याने नाल्या लगत असलेल्या सर्व शेतकऱ्यांच्या शेतीतील रोवणी केलेले धान पिक पुणता खराब झाल्याने शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात नुकसान झाली असून लावलेला रोवणी नागरणी खत औषधी खच व्यक्त गेल्याने शेतकरी हवादिप झाला असल्यामुळे अजुन नव्याने तिबार पेरणी शक्य नाही त्या मुळे शेतकऱ्यांवर कर्जबाजारी होण्याची वेळ आल्याने शासनाने पळसगाव जोगीसाखरा पाथरगोटा रामपुर सालमारा आष्टा अतरजी कासवी शंकरनगर येथील
शेतकऱ्यांच्या धान पिकाची मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावे गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष दिलीप घोडाम यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांची जिल्हाधिकारी यांच्या कडे निवेदनातून मागणी. यावेळी मधुकर प्रधान भुपाल घुटके कितीलाल पुराम रमेश मेत्राम रेवनाथ मातेरे भावराव मडावी प्रदिप सडमाके मच्छिंद्र मेत्राम अमोल पेन्दाम
महादेव नखाते संतोष काबळी युवराज धोटरे आदि उपस्थित होते.