ठाकरे गट यांचे गंभीर आरोप
एटापल्ली :-गडचिरोली चिमूर मतदार संघातील आघाडीत बिघाडी अहेरी विधानसभा इंडिया महा विकास आघाडी प्रचारसभा मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या जिल्हाप्रमुख सह इतर पदाधिकाऱ्यां ची दांडी ऐन निवडणुकीच्या वेळी प्रचार सुरू असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकारी ची गैरहजेरी लक्षणीय आहे तसेच महाविकास आघाडीचे इतर घटक पक्ष सुद्धा नाराज आहे महाविकास आघाडीचे उमेदवार वार्यावर हवेत उडत आहे काँग्रेस पक्षाच्या काही नेत्याच्या मान्य आहे की शिवसेना पक्षाचा अस्तित्व नाही यांची आम्हाला गरज नाही अशा प्रकारचे बोलल्यामुळे शिवसेना आक्रमक भूमिका घेतलेली आहे महाविकास आघाडीच्या कोणत्याही कार्यक्रमात शिवसेना पदाधिकारी बहिष्कार करून आघाडीच्या कार्यक्रमात जात नसल्याने तर्क वितर्क का लावले जात आहे जर असाच प्रकार राहिला तर नक्कीच उमेदवार डॉक्टर नामदेव किरसान यांना फटका बसू शकते असे अंदाज दर्शविले जात आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वरिष्ठाच्या अपमान व पदाधिकाऱ्यांना सर्वांना मिळाल्यामुळे शिवसेना समोर कोणती भूमिका घेणार याकडे पूर्ण गडचिरोली जिल्ह्याच्या लक्ष वेधले आहे काँग्रेस पक्ष महाविकास आघाडीचा धर्म पाळत नाही असे आरोप शिवसेना तर्फे केल्या जात आहेप्रचार सभेत भगवा झेंडे नाही पक्षप्रमुखांचे होल्डिंग नाही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे स्मृतीचिन्ह नाही अशा प्रचार सभेमध्ये आम्ही जाऊन काय फायदा आम्ही काँग्रेस नाही शिवसेना असे वक्तव्य एकजुटीने सर्व शिवसैनिक करत आहे.