शिवसेना पक्षाच्या वतीने जारावंडी येथील पाच वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केलेल्या नराधमास फाशीची शिक्षा देण्यात यावे अशी मागणी निवेदनाद्वारे तहसीलदारांमार्फत महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री यांना देण्यात आले.

300

एटापल्ली:- दि. ०९ मार्च २०२४ रोजी एटापल्ली तालुक्यातील जारावंडी गावात घृणास्पद घटना घडली. एटापल्ली तालुक्यातील जारावंडी येथील पाच वर्षाच्या चिमुकल्या मुलीवर संतोष नागोबा कोंडेकर (वय ५२, रा. भेंडाळा, ता. चामोर्शी) या नराधमाकडून लैंगिक अत्याचार करण्यात आले. हि घृणास्पद घटना मानवतेला व स्त्रि-जातीला काळीमा फासणारी असून महाराष्ट्रासाठी घृणा व लांच्छनास्पद प्रकार व निषेध करायला शब्दही अपुरे पडणारी आहेत, अश्या नराधमास समाजामध्ये राहण्याचा अधिकार नाही त्यामुळे अपराधकर्ता संतोष नागोबा कोंडेकर याला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे शिवसेना-युवासेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने करण्यात आले. याप्रसंगी उपस्थित मनीष दुर्गे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तालुकाप्रमुख एटापल्ली, अक्षय पुंगाटी युवासेना तालुकाप्रमुख एटापल्ली, नामदेव हिचामी पाणीपुरवठा सभापती नगरपंचायत एटापल्ली, किशोर कांदाे विभाग प्रमुख एटापल्ली, ऋषभ दुर्गे युवासेना शाखाप्रमुख तोडसा तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.