प्रतिनिधी//
भारतीय जनता पार्टीचे लोकप्रिय नेते,राज्याचे वने,सांस्कृतिक कार्य,मत्सव्यवसाय मंत्री तथा पालकमंत्री चंद्रपूर, गोंदिया जिल्हा (म.रा.) यांच्या वाढदिवसानिमित्त सावली तालुक्यातील प्रा आरोग्य केंद्र जिबगांव येथे व शक्ती माता मंदिर समोर वृक्षरोपन कार्यक्रम घेण्यात आला. मा.ना.सुधिरभाऊ मुनगंटीवार यांना जन्मदिवसानिमित्य वृक्षारोपण करून शुभेच्छा देण्यात आल्या.
सुधिर भाऊ मुनगंटीवार यांनी आपल्या कारकीर्दीत विविध क्षेत्रातील अनेक कामे केली आहे.त्यांच्या या कारकिर्दीमुळे लोक त्यांना लोकपुरुष म्हणून वेगळी ओळख निर्माण केली आहे.
अनेक वर्ष सुधिरभाऊ यांनी पर्यावरण दिनानिमित्त जिल्हाभरात झाडे लावून उपक्रम राबविला होता.त्याच अनुषंगाने जिबगांव येथे वाढदिवसाची भेट म्हणून वृक्षरोपण करून शुभेच्छा देण्यात आल्या.
त्यावेळी ग्रा प सदस्य राकेश गोलेपल्लीवार,केशवजी पोटे,रुमाजी गेडाम,विजय गडपल्लीवार, उमेश गोलेपल्लीवार,प्रफुल्ल पाल, राजेंद्र बावणे,नागेश बारसागडे, अनिकेत पाल,कालीदास भोयर, संतोष मेश्राम,भक्तदास भोयर,ईश्वर भोयर,विठ्ठल मेश्राम,कार्यकर्ते उपस्थित होते.