रसपल्ली येथे भव्य टेनिस बॉल क्रिकेट सामन्याचे माजी आमदार दिपकदादा आत्राम यांच्या हस्ते उदघाटन

166

#indiandastak#onlinenewsnetwork#social#political#crime#accident#

प्रतिनिधी//

*जय भीम क्रिकेट क्लब आंबेडकर नगर कडून माजी आमदार दिपकदादा आत्राम यांचा ढोल ताशाच्या गजरात भव्य स्वागत करण्यात आला*

*◆अहेरी◆* :तालुक्यातील रसपल्ली येथे जय भीम क्रिकेट क्लब आंबेडकर नगर कडून आयोजित भव्य टेनिस बॉल क्रिकेट सामन्याचे उदघाटन भारत राष्ट्र समितीचे नेते,आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय अध्यक्ष व माजी आमदार दिपकदादा आत्राम यांच्या हस्ते करण्यात आले.सामन्याच्या उदघाटन पूर्वी मुख्य रस्त्यापासून मैदानापर्यंत ढोल ताशाच्या गजरात भव्य मिरवणूक काढुन,महापुरुषांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करून सामन्याचे उद्घाटन करण्यात आले.

या उदघाटन सोहळ्याला अध्यक्ष मदनाजी नैताम माजी सरपंच जिमलगटा तर प्रमुख पाहुणे म्हणून वेलगूर ग्राम पंचायत चे उप सरपंच उमेशजी मोहुर्ले,किष्टापुर ग्राम पंचायत चे सदस्य चिन्नाजी तलाडी,माजी ग्राम पंचायत सदस्य सानु मडावी,आवीस सल्लागार ईश्वरजी कोटा,मदनाजी येलाम,गणपतजी वेलादी,किशोरजी मडावी,बापू दाहागावकर,रमेश वेलादी,भिमा कुळमेथे,मधुकर कोंडागुर्ला,अहेरी शहराध्यक्ष मिलिंद अलोने,व्येकटेश बोरकुट,नरेंद्र जनगम,प्रवीण रेषे,जुलेख शेख,विनोद कावेरी,संदीप बडगे सह आविस व बीआरएस चे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी माजी आमदार दिपकदादा आत्राम यांनी क्रिकेट खेळाविषयी व परिसरातील ज्वलंत समस्यांवर उपस्थित खेडाळु व नागरिकांना मोलाचे मार्गदर्शन केले.

भव्य टेनिस बॉल क्रिकेट सामन्यासाठी प्रथम पुरस्कार माजी आमदार दिपकदादा आत्राम यांच्या कडून तर द्वितीय पुरस्कार माजी जिल्हा परिषद सदस्या अनिताताई दिपकदादा आत्राम यांच्याकडून तर तृतीय पारितोषिक वन परिक्षेत्र अधिकारी यांच्या कडून असे एकूण तीन पुरस्कार ठेवण्यात आले.

जय भीम क्रिकेट क्लब आंबेडकर नगर कडून आयोजित भव्य टेनिस बॉल क्रिकेट सामन्याचे उदघाटनीय कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रवीण कोठारी यांनी मानले.या भव्य टेनिस बॉल क्रिकेट सामन्याचे उदघाटनीय सोहळ्याला जिमलगट्टा,रसपल्ली सह परिसरातील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते. सामन्याच्या यशस्वीतेसाठी प्रवीण कोठारी,वसंत कुमरे,गणेश दहागावकर,मधुकर कोंडागुर्ला,नरेंद्र जनगम,सुर्यभवन कुमरे,जतीन जनगम,गणेश दहागावकर,प्रदीप कोठारी,नरेश दाहवाकर सह जय भीम क्रिकेट क्लब आंबेडकर नगर मंडळाच्या पदाधिकार्यांनी परिश्रम घेतले.