प्रतिनिधी//
अहेरी पंचायत समितीचे माजी सभापती श्री.भास्कर तलांडे यांना वार्डवशियाच्या निवेदन
अहेरी तालुक्यातील राजाराम येतील दलित वस्तीत वार्ड क्र.३ येतील नागरिकांना कमी दाबाचा वीज पुरवठा मुळे चांगलेच त्रास सोसावा लागत आहेत.
हवा, पाऊस नसतांना सुद्धा कमी दाबाचा पुरवठा मुळे उकाड्याने हैराण झाले आहेत सतत वीज खंडित होत असलेल्या विजपूरवठा सुरळीत कधी होऊल. याची वाट नागरिकांनी पहावे लागत आहे.
महावितरण कंपनीचे भोगस कारभाराचा फटका शालेय विध्यार्थी, व्यवसायीकांना तसेच नागरिकांना. सहन करावा लागत आहे.सततचा खंडित वीज पुरवठा दर ५,१०मिनिटाला तड्यात, मड्यात होत असते. यापासून महाविज वितरण कधी सुटका करणार अशा प्रश्न नागरिकांना उपस्थित होत आहे.
गेल्या काही महिन्यापासून राजाराम परिसरात अनेक भागात वीज खंडित होण्याचे प्रमाण अधिक वाढत आहे.
राजाराम परिसरात खांदला, पत्तीगांव, मरनेल्ली, कोतागुडम, चिरेपल्ली, रायगट्टा, गोल्लाकजी, निमलगुडम, गुड्डीगूडम, इत्यादी गावे येत असून. या भागात नेहमीच वीज पुरवठा खंडित होत असून नागरिक चांगलेच हैराण झालेले आहेत.
वीज एकदा गेली की, वीज यायला तसोन तास चातकपक्षां सारखी वाट बघावी लागत असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे साप, विंचू निघण्याचे प्रमाण अधिक असते. व साप, विंचू चावून दगावन्याची शक्यता नाकारता येत नाही.
तसेच शाळेतील विध्यार्थ्यांवर अभ्यासावर देखील भर पडत असतो.सुरळीत वीज पुरवठा होण्यासाठी वाट पाहणे नित्य नियमाचा खेळ झाला आहे.
वीज पुरवठा अभियंता यांना वारंवार फोन द्वारे सूचना देऊनही जाणून बुजून दुर्लक्ष करीत आहे.वीज बिलाची रक्कम विद्युत वितरण विभाग मात्र बिलाची रक्कम वेळोवेळी घेत असतात.आणि रक्कम भरणा नाही केल्यास तातळीने वीज कापली जाते मात्र वीज पुरवठा सुरळीत केले जात नाही.
राजाराम परिसरातील लाईनमॅन मुख्यालयी राहत नसून नागेपल्ली ला राहत असून त्याच्या हाताखाली एक किव्हा दोन लोकांना ठेवत असून ते आपल्या मनमानी नुसार काम केले जाते. आणि ते लाईनमॅन नसतांनासुद्धा खांबावर चडून दुरुस्ती करीत असतात.त्याच्या जीवीतास धोका झाल्यास किव्हा काही कमी जास्त झाल्यास जबाबदार कोण असा प्रश्न नागरिकांनी म्हटले आहे. त्यांना कामावरून काडून कायमस्वरूपी लाईनमॅनची पदभरती करावी.व राजाराम परिसरातील वीज वितरण कंपनीने लक्ष देऊन सुरळीत करावे.
तसेच दलित वस्तीतील कमी दाबाचा विज पुरवठा सुरळीत करण्यासाठी वरिष्ठ पातळीवर पत्र व्यवहार करावी अशी निवेदन अहेरी पंचायत समितीचे माजी सभापती श्री.भास्कर तलांडे यांना दलित वस्तीतील नागरिकांनी निवेदन दिले आहे.
निवेदन देताना
सामाजिक कार्यकर्ता मधुकर गोंगले, सुधाकर गोंगले,
मनोज आकदर, तुळशीराम झाडे, हणमंतू झाडे, सदाशिव गोंगले, किशोर गोंगले, शंकर झाडे, व्यंकटेश गोंगले, लक्ष्मण दुर्गे, भीमराव गोंगले, जयराम दुर्गे, गोविंदा गोंगले, व्यंकटेश दुर्गे, साईनाथ दुर्गे, तुळशीराम बोरकर, बोन्दय्या दुर्गे, सुनीता बामनकर, संतोष बामनकर, मनोज बामनकर, गोपाल चंदनखेडे,आदि उपस्थित होते.
सुपर फास्ट महाराष्ट्र मीडिया गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी मधुकर गोंगले.