ग्रामसेवक गावात राहत नाहीत, तुम्हीच सांगा विकास साधणार कसा

327

#indiandastak#onlinenewsnetwork#social#political#crime#accident#

प्रतिनिधी//

एटापल्ली : ग्रामसेवक हा गाव आणि सरपंच यामधील विकासात्मक दुवा समजला जातो. एटापल्ली पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या तुमरगुंडा ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक मुख्यालयी राहत नसून ‘अपडाऊन’ करतात. त्यामुळे गावविकासाला ‘खीळ’ बसेल हे सहजच आहे. बरेचशे ग्रामसेवक पन्नास ते शंभर किलोमीटरचा प्रवास करीत असतात. त्यामुळे तुम्हीच सांगा गावाचा विकास कसा साधणार? असा सवाल पुढे आला आहे.
तालुक्यातील तुमरगुंडा ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक हे कोणत्याही कामानिमित्त गेले असता कार्यालयात सापडतच नाहीत दिनांक २७ फेब्रुवारी रोजी संबंधित ग्रामसेवक यांना काही कामानिमित्त गडचिरोली वार्ता न्युजचे वार्ताहर राकेश तेलकुंटलवार व देशौनतीचे वार्ताहर शेषराव संगीडवार हे गेले असता ग्रामसेवक कार्यालयात हजरच नाहीत जिल्हा परिषदेमार्फत राज्यशासनाच्या व केंद्रशासनाच्या कल्याणकारी योजना राबविल्या जातात. कल्याणकारी शासन म्हणून या सेवा ग्रामीण भागातील जनतेला सर्वकाळ उपलब्ध होतील, असे शासनाकडून पाहिले जाते. यासाठी जिल्हा परिषदेमार्फत नियुक्त केल्या जाणाऱ्या ग्रामसेवकांना मुख्यालयी राहणे बंधनकारक केले आहे. मात्र, गावपातळीवर ग्रामसेवकांना गावाचा सर्वांगीण विकासाच्या अनुषंगाने मुख्यालयी राहणे बंधनकारक असल्याचा ग्रामविकास विभागाने धोरणात्मक निर्णय देखील घेतला आहे. मात्र, सदर निर्णयाची पायमल्ली होताना दिसून येत आहे. याकडे वरिष्ठांचा असलेला दुर्लक्षपणा कारणीभूत असल्याचे एकंदरीत चित्र आहे
ग्रामसेवक जर मागील सप्ताहापासुन हजर नसेल तर मग ग्रामसेवक ग्रामपंचायत सोडून जातो कुठे कींवा दुसरे खाजगी काम तर करीत नसेल काय? अशी शंका निर्माण होणे स्वाभाविक आहे. ग्रामपंचायत कुलुपबंदच असते तर इतर कर्मचारीपण जातात कुठे हाही संशोधनाचा विषय झाला आहे व वरीष्ठ स्तरावरून चौकशी होणे गरजेचे झाले आहे.

गटविकास अधिकाऱ्यांना दिनांक २७ फेब्रुवारी रोजी विचारले असता तुमरगुंडा येथील ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक मुख्यालयी राहतात का आणि दिनांक २७ फेब्रुवारी रोजी कार्यालयात हजर नाहीत करीता सुट्टीवर आहेत का असे विचारले असता गटविकास अधिकारी यांनी सुट्टीवर नसुन कार्यालयात असतील असे सांगितले