#indiandastak#onlinenewsnetwork#social#political#crime#accident#
प्रतिनिधी//
गडचिरोली:- आदिवासी एकता युवा समिती जिल्हा शाखा गडचिरोली तर्फे स्थानिक गोकुळ नगर येथील क्रांतीसुर्य भगवान बिरसा मुंडा चौकात हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी संघटनेचे अध्यक्ष उमेश उईके होते तर प्रमुख उपस्थिती सचिव प्रदीप कुलसंगे होते यावेळी उपस्थित मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर प्रकाश टाकून त्यांच्या विचारावर चालून समाजाला एकत्र करण्याचे काम करावे असे आवाहन केले.
यावेळी उपस्थित त्यांनी शिवाजी महाराज बिरसा मुंडा यांचा जयघोष केला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संघटनेचे उपाध्यक्ष सुधीर मसराम,कार्याध्यक्ष संजय मसराम,सहसचिव प्रफुल्ल कोडापे,अमोल कुळमेथे,गिरीश उईके,आकाश कोडापे,प्रदीप मसराम,निलेश कोडापे,योगेश कोडापे,देवाजी कोडापे,अजय कुकुडकर,क्रिश मोहुर्ले,रिद्धीमा कुलसंगे व परिसरातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन व आभार अमोल कुळमेथे यांनी केले.