प्रतिनिधी//
दिनांक 30 ऑगस्ट 2023 ला रात्री 9 वाजता आदिवासी आश्रम शाळा तालुका कारंजा जिल्हा वर्धा येथील आश्रम शाळेमध्ये इयत्ता सातवी या वर्गामध्ये शिकणारा अमरावती जिल्ह्यातील मेळघाट मधील डोमा या गावांमधील आदिवासी कोरकू
प्रवर्गातील शिवम सनोज उईके या विद्यार्थ्यांचा सदर आश्रम शाळांमध्ये घातपातामुळे मृत्यू झालेला आहे.
दिनांक 30 ऑगस्ट 2023 ला रात्री प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय वर्धा जिल्हा नागपूर यांनी त्यांच्या सहकार्यासह सदर आश्रम शाळेला भेट दिली.
त्यावेळी सदर शाळेमध्ये मृत विद्यार्थ्याचे आई-वडील व इतर नातेवाईक आलेले होते.
सदर शाळेच्या मुख्याध्यापक यांनी प्रकल्प अधिकारी यांना सदर दिवशी रात्री नऊ वाजून 30 मिनिटांनी फोन केला .
परंतु….
सदर मुख्याध्यापक यांनी पोलीस स्टेशन कारंजा व प्राथमिक आरोग्य केंद्र कारंजा यांना त्याच वेळेस का कळवले नाही.
प्रकल्प अधिकारी सदर शाळेत आल्यानंतर रात्री अकरा वाजून 45 मिनिटां नंतर पोलीस व डॉक्टर सदर आश्रम शाळेत आले व त्यांनी त्या विद्यार्थ्यास मृत घोषित केले.
सदर प्रकरणांमध्ये मेळघाट मधील आदिवासी विद्यार्थ्यांचा घातपातामुळे मृत्यू झाला आहे हे सदर प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय वर्धा जिल्हा नागपूर यांच्या या अहवालावरून सिद्ध होते.
प्रकल्प अधिकारी वर्धा यांनी सदर आदिवासी विद्यार्थ्यांचा घातपातामुळे मृत्यू झाल्या प्रकरणी ..
सदर संस्थेचे संस्थाचालक वर्धा जिल्ह्यातील आर्वी विधानसभा क्षेत्राचे आमदार दादाराव केचे
यांच्या सदर शाळेतील शालेय प्रशासना ,मुख्याध्यापक, अधीक्षक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या दुर्लक्षितपणामुळे सदर विद्यार्थ्यांचा घातपातामुळे मृत्यू झालेल्या आहे.
प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प वर्धा जिल्हा नागपूर यांनी सदर आश्रम शाळा नारा तालुका कारंजा जिल्हा वर्धा येथील प्रशासनाच्या गैर कारभारामुळे आदिवासी विद्यार्थ्यांचा घातपातामुळे मृत्यू झाल्यामुळे सदर आश्रम शाळेची कायमस्वरूपी मान्यता रद्द करण्याचा प्रस्ताव माननीय अप्पर आयुक्त आदिवासी विकास कार्यालय नागपूर यांच्याकडे आज दिनांक चार सप्टेंबर 2023 ला पाठवणार आहे.
सदर विद्यार्थ्यांच्या मृत्यू बाबत शालेय व्यवस्थापनाचा दुर्लक्षितपणा हा कारणीभूत आहे.त्यामुळे तेथील मुख्याध्यापक, अधीक्षक व वर्गशिक्षक यांना चौकशी पूर्ण होईपर्यंत निलंबित करण्याचा प्रस्ताव माननीय प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय वर्धा यांनी सदर संस्थेकडे पाठवलेला आहे.
आदिवासी आश्रम शाळा तालुका कारंजा, जिल्हा वर्धा येथे 30 ऑगस्ट 2023 ला घातपातामुळे इयत्ता सातवी मधील विद्यार्थ्यांचा मृत्यू झालेला आहे
.त्या प्रकरणाची चौकशी कारंजा पोलीस स्टेशनचे ठाणेदार व जिल्हा पोलीस अधीक्षक वर्धा यांच्या विशेष पथकाद्वारे सदर प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येत आहे.
मेळघाट चे आमदार राजकुमार पटेल व मृत विद्यार्थ्यांचे आई-वडील यांनी सदर विद्यार्थ्यांच्या मृत्यू बाबत संस्था चालक आमदार दादाराव केचे हे जबाबदार असल्यामुळे त्यांच्यावर भारतीय दंड संहिता अधिनियम 302 अंतर्गत सदोष मनुष्यवघाचा गुन्हा दाखल करावा व ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत सुद्धा गुन्हा दाखल करावा.
अशी आदिवासी कोरकू समाजाने माननीय मुख्यमंत्री व माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडे मागणी केलेली आहे.
आदिवासी समाजाच्या वतीने प्रेस नोट
संजय वामनराव बडवाईक यवतमाळ 95 45 96 62 49.
दिनांक. 4 सप्टेंबर 2023
स्थळ.. कारंजा