महाराष्ट्र राज्यात झालेल्या तलाठी भरती २०२३ प्रक्रिया तात्काळ रद्द करून नव्याने घ्यावे अशी मागणी

205

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने निवेदनाद्वारे तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात आले

एटापल्ली :- तीन भागात ५७ सत्रांमध्ये घेण्यात आलेल्या तलाठी भरती परीक्षेस महाराष्ट्रातून १० लाख ४१ हजार ७१३ परीक्षार्थ्यांनी अर्ज केल होत. यापैकी ८ लाख ६४ हजार ९६० उमेदवारांनी परीक्षा दिली असून या तलाठी भरतीसाठी झालेल्या परीक्षेतील घोळ उघडीस आल्यानंतर हि परीक्षा पास झालेल्या भावी तलाठ्यांच्या भरतीची नौका वादंगात सापडली आहे, परीक्षार्थी मध्ये कट ऑफ किती मार्कांना लावणार, आता ज्यांना १५० ते २०० दरम्यान मार्क्स मिळाले ते तरी खरे आहेत का किवा पुन्हा परीक्षा द्यावी लागणार असा संभ्रम आहे? TCS या कंत्राटी कंपनी मार्फत घेतल्या गेलेल्या तलाठी परीक्षेत मोठा घोळ झाला असून यांचा परिणाम महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांवरती झालेला आहे. TCS या परीक्षा घेणाऱ्या कंत्राटी कंपनीला बंद करण्यात यावे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत हि तलाठी भरती प्रक्रिया नव्याने घेण्यात यावी तसेच Normalisation पद्धत बंद व्हावी, Online परीक्षा प्रक्रिया बंद व्हावी, परीक्षा एकाच दिवशी सर्व जिल्ह्यात व्हावी. नव्याने घेण्यात येणाऱ्या तलाठी परीक्षेसाठी परीक्षा शुल्क आकारण्यात येवू नये तसेच विद्यार्थ्यांना न्याय मिळण्याच्या दृष्टीकोनातून शिवसेना (उ.बा.ठा.) पक्षाच्या वतीने मागणी करण्यात आली. निवेदन देण्याकरिता याप्रसंगी श्री. मनिष दुर्गे तालुका प्रमुख एटापल्ली, श्री. अक्षय पुंगाटी युवसेना तालुका प्रमुख, श्री. नामदेव हिचामी नगरसेवक नगरपंचायत एटापल्ली, श्री. रिषभ दुर्गे शिवसेना विभाग प्रमुख, श्री. बादल चुनारकर युवसेना शहर प्रमुख एटापल्ली बहुसंख्येने उपस्थित होते.