पत्रकार दिनानिमित्त अहेरी युवा पत्रकार संघटनेच्या उपजिल्हा रुग्णालय येथे फळवाटप

151

अहेरी : पत्रकार दिनानिमित्त ०६ जानेवारी २०२४ रोजी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची संपूर्ण महाराष्ट्र राज्यात यांची जयंती उत्साहात साजरी केली जाते.सहा जानेवारी हा पञकार दिन असुन महाराष्ट्रामध्ये पहिले मराठी वृत्तपञ दर्पण म्हणून आचार्य बाळशास्ञी जांभेकर यांनी सुरू केले व लोकांना स्वातंञ व हक्क आधिकारा करिता जन जागृती करण्याचे कार्य हाती घेतले असे संघटनेचे कोषाध्यक्ष अशोक खंडारे आपल्या मनोगतात म्हणाले.त्याच प्रमाणे यंदा ही आलापल्ली येथील शासकीय विश्रामगृह येथे युवा पञकार बाधवातर्फे गडचिरोली जिल्हा तर्फे पञकार दिननिमित्त आचार्य बाळशास्ञी जांभेकर यांच्या प्रतिमेस भास्कर फरकडे गडचिरोली वार्ता न्युज पोर्टलचे संपादक यांच्या हस्ते माल्यर्पण करण्यात आले असुन संघटनेचे पदाधिकारी तथा युवा पञकाराच्या हस्ते पुजन करुन मानवंदना देण्यात आली.
व विविध विषयांवर चर्चा करून अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालय येथे रुग्णांना फळ वाटप करण्याचे आयोजन करून फळवाटप करण्यात आले.
यावेळी अशोक खंडारे वैनगंगा वार्ता न्युज संपादक, सुरेश मोतकुरवार इंडियन दस्तक न्युज संपादक, भास्कर फरकडे संपादक गडचिरोली वार्ता न्युज,अक्षय गोंगले उपसंपादक गडचिरोली वार्ता न्युज, मधूकर गोंगले महाराष्ट्र संदेश न्युज जिल्हा प्रतिनिधी,उमेश गझल्लपल्लीवार विदर्भ न्यूज एक्स्प्रेस प्रतिनिधी, फुलचंद वाघाडे वैभव पुणे दैनिक प्रतिनिधी गडचिरोली, राकेश तेलकुंटलवार गडचिरोली वार्ता न्युज प्रतिनिधी एटापल्ली, किशोर उसेंडी गोंडवाना शक्ती न्युज संपादक, श्रावण वाकोडे वैनगंगा वार्ता न्युज 24 संपादक, श्रीनिवास बंडमवार, मारोती कांबळे,तेजस गुजल्लवार इंडियन, दस्तक चे प्रतिनिधी रोशन नरुले, यावेळी उपस्थित होते