आयटक चे निवेदन स्वीकारण्यासाठी कुणी जबाबदार व्यक्ति कार्यालयात हजर नाही
तालुका प्रतिनिधी// तेजेश गुज्जलवार
एटापल्ली :मी 2024-01-04 रोजी दुपारी १ वाजता आपल्या कार्यालयात आयटकचे निवेदन सादर करण्यासाठी माझे सहकारी व इतर नागरिकांसोबत आलो होतो. परंतु, तेव्हा कार्यालयात कुणीही जबाबदार व्यक्ति उपस्थित नव्हते. मी कार्यालयातील कर्मचारींकडे निवेदन सादर करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी मला सांगितले की त्यांची जबाबदारी नाही.
यामुळे, आम्हाला आपले निवेदन सादर करता आले नाही. निवेदन व त्याची एक प्रत जी आम्हाला निवेदन मिळाले असे लिहून सत्यप्रत हवी होती ती आपल्या कार्यालयातच ठेवून यावे लागले कारण आयटक चे निवेदन स्वीकारण्यासाठी कुणी जबाबदार व्यक्ति कार्यालयात हजर नव्हते, यामुळे आम्हाला नाराजी झाली आहे. राजकीय प्रतिनिधी चे काम लक्ष द्यायला आपल्या कार्यालतात कुणी सक्षम जवाबदार व्यक्ति नाही आहे, सामान्य नागरिकांची कामे कशी होणार ?
कृपया याबाबत योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी.
आयटक कॉ. सचिन मोतकुरवार ता. सचिव तथा
जिल्हा संघटक आणि राज्य कार्यकारिणी सदस्य महाराष्ट्र राज्य शालेय पोषण आहार कर्मचारी यूनियन। प्रशांत तेलकुंटलवार सूरज जकुलवार शरीफ शेख अजय तेलकुनटलवार ओमकार पुज्जलवार