लोकमत सखी मंच आलापल्ली तर्फे सत्कार समारंभ तसेच रक्षाबंधन कार्यक्रम #jantechaawaaz#news#portal#

61
प्रतिनिधी//

*टायगर ग्रुपची सामाजिक कार्याची दखल घेत केला गौरव



माजी राज्यमंत्री मा.राजे अम्ब्रिशराव महाराज आत्राम यांच्या प्रमुख उपस्थितीत टायगर ग्रुप आलापल्लीच्या सामाजिक कार्याचा सखी मंच तर्फे गौरव.

ग्रामीण भागातील शोषित, पीडित, वंचितांच्या समस्यांना घेऊन कार्य करीत असल्याबद्दल टायगर ग्रुप आलापल्ली सामाजिक संस्थेच्या सदस्यांचा माजी पालकमंत्री तथा राज्यमंत्री मा.राजे अम्ब्रिशराव महाराज आत्राम यांच्या प्रमुख उपस्थितीत सखी मंच आलापल्ली तर्फे पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

गेल्या ८ वर्षांपासून जिल्ह्यातील ग्रामीण भागात गरजू लोकांना मोफत रुग्णवाहिका सेवा व उपजिल्हा रुग्णालयात आलेल्या रुग्णांना रक्तपुरवठा ग्रामीण भागातील गरजू विद्यार्थिनी सायकल वाटप गरीब लोकांना ब्लँकेट वाटप आणि पुर- परिस्थितीत लोकांना तात्काळ मदत व कत्तली साठी जाणाऱ्या गोवंशाना जीवनदान देणे अशी अनेक सामाजिक कामे टायगर ग्रुपच्या माध्यमातून केली जात आहेत. ग्रामीण भागातील जनसामान्य जनतेसाठी टायगर ग्रुप देवदूत ठरले आहे त्यांचा कार्याची दखल घेऊन सखी मंच आलापल्ली तर्फे पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा.राजे अम्ब्रिशराव महाराज आत्राम माजी राज्यमंत्री तथा पालकमंत्री, आलापल्ली ग्रा. प.सरपंच शंकर भाऊ मेश्राम व उपसरपंच विनोद भाऊ अकनपल्लीवार व्यापारी संगटना अध्यक्ष चंद्रकिशोरजी पांडे उपाध्यक्ष अमोल भाऊ कोलपकवार टायगर ग्रुप अध्यक्ष दौलत रामटेके,प्रमुख साई तुलसीगारी, व्हॉईस ऑफ मीडिया चे अध्यक्ष मिलिंद भाऊ कोडं, श्री राम मंदिर कमिटी आलापल्ली अध्यक्ष मदने काका आदी उपस्थित होते .