बिरसा मुंडा चौक गडचिरोली येथे संविधान सभेचे सदस्य मा. जयपाल सिंग मुंडा व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी

195

 

गडचिरोली:- दि.३-०१-२०२४ ला भगवान बिरसा मुंडा चौक चामोर्शी रोड गडचिरोली येथे संविधान सभेचे सदस्य मा. जयपाल सिंग मुंडा व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले याची संयुक्तरीत्या जयंतीचा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्री प्रियदर्शन मडावी सर यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व जयपाल सिंह मुंडा यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकून समाजाला उत्कृष्ट मार्गदर्शन केले. तसेच मा. धिरज जुमनाके सर सुद्धा उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन उमेशभाऊ ऊईके यांनी केले तर आभार मंगेश नैताम यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीते करीता आदिवासी एकता युवा समितीचे अध्यक्ष उमेश उईके, उपाध्यक्ष सुधीर मसराम, संजय मेश्राम, मंगेश नैताम सतिशभाऊ कुसराम, धीरज जुमनाके, देवराव कोवे, गिरीश उईके, आकाश कोडापे, प्रफुल कोडापे, विलास चहांदे, बल्लू सोनुले व वार्डातील व परिसरातील समाज बांधव उपस्थित होते.