चामोर्शी:-चामोर्शी तालुक्यातील मौजा सोनापुर येथे पेसा दिन दिनांक २४-१२-२०२३ रोजी गावकऱ्यांच्या उपस्थितीत भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर, भगवान बिरसा मुंडा, क्रांतीवीर शहीद वीर बाबुराव शेडमाके, विरांगणा राणी दुर्गावती यांच्या प्रतिमेला मालार्पण करुन साजरा करण्यात आला.
पेसा कायदा ह्या संविधानाच्या ५ व्या अनुसूची नुसार डॉ बाबासाहेब आंबेडकर ज्या तरतूदी केल्या होत्या त्यानुसार पेसा कायद्याची निर्मिती करण्यात आली. डॉ बाबासाहेब आंबेडकरानी घटनेमध्ये ५ वी अनुसूची व ६ वी अनुसूची आदिवासी भागातील प्रशासनिक व्यवस्था संदर्भात तरतूद केलेली होती. त्यानुसार २४ डिसेंबर १९९६ ला केंद्र सरकारने देशामध्ये पेसा कायदा लागू केला. त्यानुसार गावामध्ये राहणारे आदिवासी व गैरआदिवासी १८ वर्षांवरील संपूर्ण जे मतदार आहेत, त्यांना मिळून प्रत्येक गावात ग्रामसभा ला मान्यता दिली. ग्रामसभेला विशेष असे अधिकार देण्यात आले. ज्या अधिकारामधून गौण वनोउपज, गौणखानिज, गावातील व्यवस्थापन, बाजारातील व्यवस्थापन व आदिवासींच्या सांस्कृतिक परंपरेनुसार त्या भागातील त्या गावातील स्वयंशासन चालवण्याचे अधिकार या पेसा कायदा अंतर्गत ग्रामसभेला देण्यात आले. हि परंपरा व पेसाची व्यवस्था पूर्वी पासून आदीवासीच्या चालीरीती परंपरा त्याच्या धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक व्यवस्थापन मध्ये होत्या. तेच कायद्याच्या रूपाने २४ डिसेंबर १९९६ ला केंद्र शासनाने घटनादत्त मान्यता देण्यात आलेली आहे. परंतू पेसा व वनहक्क कायदा अंतर्गत त्याची अंमलबजावणी ज्या पद्धतीने व्हायला त्या पद्धतीने अमलबजावणी होत नाही आहे. तरी शासन प्रशासन दक्षता घेऊन पेसा आणि वनहक्क कायदेची अमलबजावणी योग्य प्रकारे केल्यास आदिवासी भागामध्ये सुशासन निर्माण होण्यास मदत होईल असे मत याप्रसंगी उपस्थितांनी केले.
यावेळी उत्तम कोवे,नारायण कन्नाके,देवाजी कोवे,दशरथ कोवे, ऋषिदेव सिडाम, देविदास कोडापे,देवराव सिडाम, नारायण गेडाम, उध्दव गेडाम, प्रकाश कुळमेथे,पुरुषोत्तम कोवे,नितेश गेडाम, दीपक मेश्राम,कल्पना सिडाम, मायाबाई कोवे, लताबाई कुळमेथे, नीता मेश्राम,नेहा सोयाम,कल्याणी कोडापे, प्रेमिला मडावी, यांच्यासह इतर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.