- आज दिनांक. 21/12/2023 रोजी पोलीस दादालोरा खिडकी अंतर्गत उप पोलीस स्टेशन राजाराम खा. येथे उपपोस्टे हद्दीतील नागरिकांची आरोग्य तपासणी करून योग्य उपचार करणे करिता उपपोलीस स्टेशन राजाराम खा. येथे *भव्य आरोग्य मेळावा* चे आयोजन करण्यात आले होते.
सदर आरोग्य मेळाव्याचे अध्यक्ष मंगला आत्राम सरपंच राजाराम , प्रमुख पाहुणे डॉ.राजेश मानकर आरोग्य अधिकारी राजाराम, रोशन कबगौनिवार उपसरपंच राजाराम . डॉ.नैताम पशु वैद्यकीय अधिकारी राजाराम, कु.डॉ.अस्मिता देवगडे उप जिल्हा रुग्णालय अहेरी आलाम ग्राम पंचायत सदस्य राजाराम. प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक कसबेवाड,पोलीस उपनिरीक्षक गजानन साखरे ,पोलीस उपनिरीक्षक आकाश जाधव, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक मनोहर नैताम सा. एसआरपीएफ चे पीएसआय वाकळे सा. मेळाव्याला हजर होते. कार्यक्रमाची सुरुवात शहीद बिरसा मुंडा,यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली.
सदर मेळाव्यात उपस्थित नागरिकांना आम्ही पो उपनी कसबेवाड . यांनी आरोग्य विषयक माहिती देवून प्रधानमंत्री आयुष्यमान भारत, आभा कार्ड याचे महत्व पटवून मार्गदर्शन करून पोलीस दादालोरा खिडकी च्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या विविध शासकीय योजनांची माहिती दिली.
सदर मेळाव्यात उपस्थित नागरिकांचे व विद्याथी यांचे आरोग्य तपासणी करण्यात आले 150 नागरीकांचे बी.पी.तपासणी,90 नागरीकांचे शुगर तसेच सिकलसेल, टायफाईड तपासणी करण्यात आले. मेळाव्यात उपस्थित 50 नागरीकांचे प्रधानमंत्री आयुष्यमान भारत कार्ड,40 आभा कार्ड काढून देण्यात आले तसेच 60 नागरिकांचे गोल्डन कार्ड काढण्यात आले.
*मेळाव्यामध्ये खालील प्रमाणे साहित्य देण्यात आले.*
1. स्वेटर 20 नग
2. फावडे 10 नग
3. टिकाव 10 नग
4. मच्छरदाणी 10 नग
5. व्हॉलिबॉल व नेट 1 नग
सदर मेळाव्याला 400 ते 500 नागरिक उपस्थित होते. सदर मेळाव्याला उपस्थित नागरिकांना जेवणाची व्यवस्था करण्यात आली.
सदर मेळावा यशस्वी करणेसाठी उपपोलीस स्टेशन राजाराम खा. चे अधिकारी/अंमलदार तसेच एसआरपीएफ अधिकारी/अंमलदार यांनी सहकार्य करून आरोग्य मेळावा शांततेत पार पाडण्यात आला.






