शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने आंदोलन छेडणार असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आले
दि.२९/११/२३ एटापल्ली:- सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे एटापल्ली-डूम्मे-जवेली मार्गाचे ६ महिन्या अगोदर उध्दघाटन करण्यात आले परंतु लिंगाटोला गावाजवळील पुलाचे बांधकाम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाल्याने पूल पडण्याच्या मार्गावर आहे, गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुका हा नक्षल प्रभावित क्षेत्र असून शासनाने अतिरिक्त निधी विकास कामांना देऊन सुद्धा अतिशय निकृष्ट दर्जाचे बांधकाम करण्यात आले. पूल पूर्णपणे खचून गेलेला आहे मोठ-मोठाले गड्डे पडल्याने त्या परिसरातील ग्रामस्थांना ये-जा करण्याकरिता धोक्याचे झाले आहे. दुचाकीस्वार-सायकलस्वार यांना जीव मुठीत घालून त्या पुलावरून प्रवास कराव लागत आहे. लिंगाटोला गावाजवळील पूल अपघात प्रवरण स्थळ बनले आहे. शिवसेना (उ.बा.ठा.) पक्षाच्या वतीने या अगोदर सुद्धा निवेदन दिले असता अजूनपर्यंत काहीच कार्यवाही न झाल्याचे असे दिसून येत आहे. एटापल्ली-डूम्मे लिंगाटोला गावाजवळील पुलाचे बांधकाम तात्काळ दुरुस्ती करण्यात यावे तसेच संबंधित ठेकेदारावर पूल कामाबद्दल भ्रष्टाचार केल्याप्रकरणी कठोर कार्यवाही करण्यात यावे अन्यथा शिवसेना (उ.बा.ठा.) पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला. याप्रसंगी निवेदन देताना मनीष दुर्गे तालुकाप्रमुख, अक्षय पुंगाटी युवा सेना तालुकाप्रमुख, नामदेव हिचामी नगरसेवक नगरपंचायत एटापल्ली, किशोर जी कांदो विभाग प्रमुख एटापल्ली, तेजस गुज्जलवार शाखाप्रमुख एटापल्ली, ऋषभ दुर्गे, मंगेश दूर्वा आदी सर्व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.






