करा;जिल्हाधिकाऱ्यांना सा का ताटीकोंडवार यांची निवेदनातून मागणी
सदर निवेदनात सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडवार यांनी अशे म्हटले आहे की मी गडचिरोली जिल्ह्यातील सुजाण नागरिक या नात्याने प्रशासनातील अनेक आर्थिक गैरव्यवहार अनेक निष्काळजीपणा चे प्रकरणे शासनाच्या निदर्शनास आनुन देत असतो. व काही प्रकरणात माननीय उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ नागपूर इथे जनहित याचिका सुद्धा दाखल केलेले आहे.
महोदय अहेरी उपविभागातील शेतांमध्ये सध्या स्थितीत पिकांचे नुकसान झाल्याचे निदर्शनास येत आहे कारण मागील पावसाळ्याच्या ऋतूमध्ये पाहिजे तितके पाऊस पडले नसल्याने तोंडावर आलेल्या पिकाचे नुकसान होत आहे. पावसाळ्यात शेवटच्या महिन्यात एक पाऊस आल्यास शेती हरभरीत राहिली असती मात्र पाऊसाच्या कमतरतेमुळे पीक
खराब होऊन गेले आहेत. सध्या अहेरी उपविभागातील शेतकरी मुख्य पीक म्हणून कापूस व धानाचा उत्पादन घेत आहेत त्यासाठी लागणारा खर्च देखील पीक कर्जाच्या माध्यमातून काढून तसेच स्वखर्चातून त्यांनी खर्चीला आहे परंतु आता शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाचे नुकसान होणार असल्याने आर्थिक संकट भोवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसे झाल्यास शेतकरी कर्जबाजारी होणार व पुढे पीक काढण्यास तयार नसणार व भुकमरी होण्याची शक्यता निर्माण होणार आहे.
तसेच लोखनिज वाहतुकीच्या धुळीमुळे देखील रस्त्यालगतच्या शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, त्यावर लाल धूळ बसली असल्याने पिकांची स्थिती खूप खराब होऊन आहे त्यामुळे या परिसरातील शेतक-यांमध्ये रोष व्यक्त होत आहे व या पिकांचे नुकसान भरपाई कोण देणार..? असा सवालही शेतकऱ्यांकडून केला जात आहे. तसेच अनेक लोकांचे वॉटर पॉल्युशन मुळे व एअर पॉल्युशन मुळे पोटातले आतड्या आणि फेफडे खराब होण्याच्या मार्गावर झाले व होत आहे. तसेच लोह दगडाच्या धुळीमुळे पशुपक्षी व जनावरांच्या चारा व पिण्याच्या पाण्यात सदर लोह खनिजाची कन मिक्स
होवुन सदर पशुपक्षी व जनावराला जीव जात आहे. जोपर्यंत लोह दगड वाहतूकीची स्वतंत्र कॉरिडॉर किंवा पाईपलाईन होत नाही तो पर्यंत उत्खनन व वाहतुक करून पर्यावरणाच्या समतोल राखवा. असे सर्वसामान्य जनतेचे म्हणणे आहे. तसेच सदर लोह खनिज वाहतुकीचा त्रास गरोदर मातांना सुद्धा उपचारासाठी नेण्यासाठी अनेक अडचणीच्या त्रास सहन करावा लागत आहे व शाळकरी विद्यार्थ्यांना सुद्धा त्रास होत आहे.
धान व कापूस हा पीक मुख्य उत्पादन असल्याने सध्या जिल्हाभरात मोठ्या प्रमाणात उत्पादन घेणे सुरू आहे मात्र पाऊस पडला नसल्याने शेतीचे हाल झाले आहे. म्हणून जर पिकाचे नुकसान झाल्यास शासन व प्रशासनाने या शेतकऱ्यांची समस्या लक्षात घेऊन त्यांना पीक कर्जाची माफी द्यावी व आर्थिक मदत करावी अशी मागणी सर्वसामान्यातून केली जात आहे.
सबब ही बाब लक्षात घेऊन शेतकऱ्यांना तत्काळ मदत करावे ही विनंती. केली आहे