राष्ट्रवादीचा प्रत्येक कार्यकर्ता हा पक्षाचा कणा:ना.धर्मराव बाबा आत्राम #jantechaawaaz#news#portal#

53
प्रतिनिधी//

अनेकांनी केले राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश

भामरागड:लोकशाहीत राजकीय पक्षाची ताकद ही त्यांच्या कार्यकर्त्याच्या क्षमतेवर आहे. पक्षाचे ध्येय धोरण आणि पक्षाच्या सरकारने केलेल्या विकास कामांची माहिती जनतेपर्यंत नेण्याचे खरे काम हे कार्यकर्ते करतात. राष्ट्रवादी कांग्रेस मध्ये काम करणारा प्रत्येक कार्यकर्ता हा पक्षाची ओळख असून त्यांच्या ताकदीच्या भरवश्यावर राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता येऊ शकते.पदाधिकारी यांनी सामान्य कार्यकत्यार्ना सोबत घेऊन पक्ष संघटना मजबूत करावी. सामान्य कार्यकर्ता हा पक्षाचा कणा आहे, असे प्रतिपादन अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी केले.




















भामरागड येथे राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाच्या तालुका स्तरीय कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते.यावेळी माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री आत्राम, माजी प स सदस्य हर्षवर्धन बाबा आत्राम,राष्ट्रवादी काँग्रेसचे भामरागड तालुका अध्यक्ष रमेश मारगोनवार,तसे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.















पुढे बोलताना महायुती सरकार कडून विविध शासकीय योजना राबविले जात आहेत. त्या सर्व योजना तालुक्यातील शेवटच्या घरापर्यंत पोहविण्यासाठी कार्यकर्त्यांनी पुढाकार घ्यावा.वेळोवेळी पक्षातर्फे राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती घेऊन सामाजिक कार्य करावे असेही त्यांनी निर्देश दिले.यावेळी माजी जि प अध्यक्ष यांनीही कार्यकर्त्यांना मोलाचे मार्गदर्शन केले व भामरागड तालुक्यातील नागरिकांची समस्या जाणून घेतली.



















विविध पक्षातील कार्यकर्त्यांचा राकॉ मध्ये प्रवेश

















भामरागड तालुका मुख्यालयातील वन विभागाच्या विश्राम गृहात घेण्यात आलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात विविध गावातील नागरिकांनी नामदार धर्मराव बाबा आत्राम यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केले. यावेळी ना. धर्मराव बाबा आत्राम तसेच माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री ताई आत्राम यांनी पक्षाचा दुपट्टा देत कार्यकर्त्यांचे स्वागत केले.