गडचिरोली जिल्ह्यात प्रथमच आद्यक्रांतीकारक राघोजी भांगरे यांची जयंती उत्साहात साजरी.

207

 

गडचिरोली:- अखिल भारतीय आदिवासी विकास युवा परिषद, गडचिरोली व आदिवासी एकता युवा समितीच्या संयुक्त विद्यमाने गडचिरोली शहरातील मुंडा चौक येथे आद्यक्रांतीकारक राघोजी भांगरे यांची जयंती प्रथमच साजरी करण्यात आली.
याप्रसंगी आद्यक्रांतीकारक राघोजी भांगरे, धरतीआबा क्रांतीसुर्य बिरसा मुंडा यांचा प्रतिमेला मालार्पन करुन अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष रोहिदासजी राऊत साहेब, प्रमुख पाहुणे कै. बाबुराव मडावी स्मारक समितीचे अध्यक्ष तथा माजी नगरसेवक गुलाबरावजी मडावी,सामाजिक कार्यकर्ते प्रियदर्शन मडावी,हंसराज उंदिरवाडे साहेब, बीआरएसपीचे जिल्हाप्रमुख राज बनसोड,
प्रमुख अतिथी शहिद वीर बाबुराव शेडमाके स्मारक समितीचे संस्थापक/अध्यक्ष वसंतजी कुळसंगे, डॉ. पुंगाटी साहेब, आदिवासी एकता युवा समितीचे सल्लागार मुकुंदाजी मेश्राम साहेब, कार्याध्यक्ष संजय मेश्राम होते.
राघोजी भांगरे यांच्या कार्य हे आदिवासी समाजासाठी उल्लेखनीय आहे. त्यांना आम्ही आदर्श क्रांतीकारक मानतो. त्यांचा इतिहास हा आदिवासी तरुणांनी समजून घेण्याची गरज आहे असे प्रतिपादन उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.
याप्रसंगी अखिल भारतीय आदिवासी विकास युवा परिषद, गडचिरोली जिल्हाध्यक्ष कुणाल कोवे, संपर्क प्रमुख बादल मडावी, जिल्हा मिडियाप्रमुख तथा आदिवासी परधान समाज मंडळाचे युवा सदस्य रुपेश सलामे, भुषण मसराम, आदित्य येरमे,कैलाश गेडाम, हसिना कांदो,गोंडवाना गोटुल समितीचे सचिन भलावी, विद्या दुगा ,जंगोरायताड आदिवासी महिला संघटनेचे आरती कोल्हे,शारदा मडावी,श्रीमती फुलन ऊसेंडी , यांच्यासह इतर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे संचालन आदिवासी एकता युवा समितीचे अध्यक्ष उमेश उईके यांनी केले तर आभार सतिशभाऊ कुसराम यांनी मानले.