अखिल भारतीय आदिवासी विकास युवा परिषद व ग्रामस्थांची मागणी.
गडचिरोली:- मुलचेरा तालुक्यातील ग्राम पंचायत येल्ला अंतर्गत ग्राम पंचायत कार्यालय येल्ला येथील सभागृहात दिनांक १०/०९/२०२३ रोजी ग्रामसभेची आयोजन केले होते. ग्रामपंचायतचे सरपंच्या सौ. वैशाली ए. सोयाम यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.
सदर ग्रामसभेमध्ये ग्रामपंचायतचे सचिव सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रा. पं. सदस्य व येल्ला, मरपल्ली, मरपल्ली टोला, नागुलवाही,मच्छीटोला या पाचही गावातील ग्रामस्थ उपस्थित होते. त्या ग्रामसभेमध्ये नोटीसनुसार काही विषयावर चर्चा करत ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आले. परंतु सदर सभेमध्ये नोटीसनुसार व अध्यक्षांच्या परवानगीने येणाऱ्या विषयानुसार अनुसूचित क्षेत्रातून गावे वगळण्याबाबतची कोणतीही चर्चा झालेली नाही व त्याबाबत ठराव घेण्यात आलेली नव्हती.
परंतु ग्रामसभा संपल्यानंतर सरपंच सचिव ग्रा. पं. सदस्य व ग्रामस्थ यांच्या अनुपस्थितीत ग्रामपंचायतचे उपसरपंच श्री. दिवाकर रावजी उराडे यांच्या आदेशानुसार किंवा सूचनेनुसार ग्रामपंचायतचे वसूलदार श्री. उमेश नामदेव मंडरे यांस प्रोसेडींग रजिस्टरवर सदर ठराव नोंद करण्यास भाग पाडले.
अशी खुलासा करत ग्रा. पंचायत ऑपरेटर किशोर मारोती राऊत यांनी दिनांक ०५/११/२०२३ रोज रविवारला दुपारी ठिक. १.३० वाजता ग्रामसभेत स्वत: हजर राहून तोंडी बयान सांगितले.
सदर खुलासानुसार ग्रामपंचायत कर्मचारी श्री. उमेश नामदेव मंडरे यास ग्रामसभेत बोलावून विचारले असता सदर ठराव ग्रा.पं. चे उपसरपंच श्री. दिवाकर उराडे व सदस्य श्री. नरेश जगन्नाथ राऊत यांच्या दबावाखाली येऊन प्रोसेडिंग रजिस्टरवर ठराव नोंद करण्यात आली. अशी कबुली दिली.
अशाप्रकारे सदरील अनुसूचित क्षेत्रातील गावे वगळण्याबाबतची ठराव ग्रा. पं च सरपंच, सचिव, सदस्य व सर्व ग्रामस्थांना विश्वासात न घेता बेकायदेशीर ठराव पारीत करण्यात आला.
तरी हा गंभीर प्रकरण लक्षात घेऊन सदर ठराव पारीत करणाऱ्या दोषींवर कायदेशीर ग्रामपंचायत अधिनियम कलम ३८ अन्वये फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांच्या विरोधात शिस्तभंगाची कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी अखिल भारतीय आदिवासी विकास युवा परिषद तालुका मुलचेरा, व गावकऱ्यांच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, गडचिरोली यांच्याकडे निवेदनातून करण्यात आली.
यावेळी अखिल भारतीय आदिवासी विकास युवा परिषद, गडचिरोली जिल्हाध्यक्ष कुणाल कोवे, मुलचेरा तालुकाध्यक्ष सतिश पोरतेट, आदिवासी एकता युवा समितीचे अध्यक्ष उमेश उईके,मिडिया जिल्हाप्रमुख रुपेश सलामे, तालुका उपाध्यक्ष काशिनाथ मडावी, भुषण मसराम,माजी उपसरपंच सत्यवान सिडाम, पोलीस पाटील येल्ला शंकर शेडमाके, माजी ग्रामपंचायत सदस्य अनिल सोयाम, मरपल्ली टोला पेसा अध्यक्ष बीच्छू आत्राम, मरपल्ली पेसा अध्यक्ष बालाजी सिडाम, येल्ला ग्रामपंचायत सदस्य दिवाकर सिडाम यांच्यासह इतर कार्यकर्ते व येल्ला ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या गावातील नागरिक उपस्थित होते.