अहेरी:तालूका मूख्यलयापासून ४९ कि.मी. अंतरावर असणारे मौजा चिरेपल्ली ,पत्तीगाव, कोत्तागूडम हे गाव आजही विकासापासून वंचित आहेत. या वरिल गावांमध्ये २०० कूंटूबाची आदिवासी लोकवस्ती असून वेळोवेळी शासनास निवेदने देण्यात आले परतू आजपर्यत फक्त हाती निराशा आले,रस्ता अभावी शालेय विध्याथ्यांना तसेच नागरिकांना नाहक त्रास शहाण करावा लागतो,दरवर्षी स्थनिक जनप्रतिनिधी मतदानाचा वेळी मोठ मोठी आश्वाशने देतात,मात्र मतदान झाला की कूठलाही प्रतिनिधी लक्ष देत नाही,मागील ७५ वर्षापासून या क्षेत्रातील लोक रस्ता कधी होईल याची प्रतिक्षा करत आहे पण प्रतिक्षा संपेना,त्यामूळे तातपूरती रस्त्याची सोय व्हावी यासाठी या क्षेत्रातील लोकांनी श्रमदान करून रस्ता बनविण्याविषयी निर्णय घेण्यात आला,यावेळी चिरेपली,कोत्तागूडम,पत्तीगाव या गावातील श्री मनोज पेंदाम,भगवान मडावी,नारू पेंदाम,तूळशिराम कूमरे,रविंद्र सोयाम,दौलत कोडापे,विजय मडावी,मूकूंद सोयाम,किशोर आलाम, आदि,बहूसंख्येन उपस्थित होते.