कॅन्सरग्रस्त विजय पुल्लीवार यांना माजी पालकमंत्री अम्ब्रिशराव आत्राम यांनी केली आर्थिक मदत

188

 

अहेरी तालुक्यातील बोरी येथील स्थानिक रहवासी विजय पुल्लीवार त्यांना तोंडाचा कॅन्सर झाले असून हैदराबाद येते सद्या त्यांचे उपचार सुरू आहे, आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट असल्याने संपूर्ण कुटुंब चिंतेत होते, कुटूंबाची ही आर्थिक समस्या कार्यकर्त्यांनी अहेरी इस्टेटचे दानशूर राजे तथा माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या लक्षात आणून दिली..!!

राजे साहेबांनी क्षणाचाही विलंब न करता कॅन्सरग्रस्त विजय पुल्लीवार यांच्या कुटूंबाला मदतीचा हात देत *10000-/(दहा हजार) रुपये* आर्थिक मदत केली तसेच शासनाच्या कल्याणकारी योजना विजय पुल्लीवार यांच्या कुटूंबाला मिळण्यासाठी मदत करनार असे सांगून समोरही सर्वतोपरी पुन्हा सहकार्य करण्याचे आश्वासन सुध्दा यावेळी राजे साहेबांनी दिले. त्यावेळी संपूर्ण पुल्लीवार कुटुंबाने राजे साहेबांचे आभार मानले.विशेष बाब म्हणजे अहेरी इस्टेटचे दानशूर राजे तथा माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम हे नेहमीच आपल्या अहेरी विधानसभा क्षेत्रातील गरजूंना आर्थिक मदत करीत असतात.सर्वतोपरी त्यांना सहकार्य करत असतात, दानशूर राजे मनून त्यांची एक प्रतिमा आहे, ह्यावेळी भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.