*माजी आमदार दिपक दादा आत्राम यांच्या जनसंवादाला शेकडो नागरिकांची उपस्थिती*
*एटापल्ली*…तालुक्यातील अतिदुर्गम ,नक्षलग्रस्त व मागासलेल्या वासामुंडी येथे आविसंचे विभागीय अध्यक्ष व माजी आमदार दिपक दादा आत्राम यांनी एटापल्ली तालुक्यातील वासामुंडी येथील शेकडो नागरिकांसोबत जनसंवाद साधत त्यांच्या व गावातील मुख्य समस्या जाणून घेतल्या.यावेळी वासामुंडी व परिसरातील शेकडो नागरिकांनी माजी आमदार दिपक आत्राम यांच्यासमोर परिसरात मागील अनेक वर्षांपासून आवसून उभे असलेल्या आरोग्य,सिंचन,रस्ते,वनहक्के दावे,शिक्षण,रोजगार असे ज्वलंत समस्या त्यांच्यासमोर मांडल्या. वासामुंडी या गावातील समस्यांवर बोलतांना माजी आत्राम यांनी म्हणाले, वासामुंडी व परिसरातील नागरिकांनी मांडलेल्या समस्यावर आपण जातीने लक्ष देऊन सोडवणुकीसाठी शर्थीचे प्रयत्न करु आणि वासामुंडी परिसरातील गावांच्या सर्वांगीण विकासासाठी आपण सरकारकडे प्रत्येक समस्यांची पाठपुरावा करू, असेही त्यांनी यावेळी उपस्थित नागरिकाना आश्वासन दिली.
हळूहळू का होईना पण माजी आमदार आत्राम यांच्या प्रयत्नाने एटापल्ली तालुक्यातील समस्याग्रस्त भागातील मार्गी लागत असल्याने या भागातील अनेक गावातील नागरिकांनी त्यांच्या कामाप्रती समाधान व्यक्त केले.
माजी आमदार दिपक दादा आत्राम यांच्या जनसंवाद सभेला वासामुंडी व परिसरातील गावातील शेकडो नागरिकांची उपस्थिती होती.
यावेळी माजी आमदार आत्राम यांचेसोबत माजी जि.प.सदस्य संजुभाऊ चरडुके,आविस तालुका उपाध्यक्ष श्रीकांत चिप्पावार,माजी सरपंच विजय कुसनाके,माजी सरपंच दिलीप गंजीवार,संदीप बडगे, गाव पाटील गजानन मडावी, भूमिया दुलसा लेकामी,रमेश कांदो,माजी नगरसेवक राहुल गावडे,विश्वनाथ मडावी,मालू मडावी,माधव मडावी,गुरुदास आत्राम,बिखा गावडे,केशव मट्टामी,कोमटी मट्टामी, शांताराम तलांडे,सुधाकर तेलामीसह आविसचे पदाधिकारी, कार्यकर्ते व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.