गट विकास अधिकारी प. स. अहेरी यांना निवेदन
गुड्डीगुडम :- महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अहेरी तालुका शाखा अहेरी च्या वतीने ग्राम रोजगार सेवक यांचे प्रलंबीत मागण्या न सुटल्यामुळे काम बंद आंदोलनाचे ईशारा गट विकास अधिकारी पंचायत समिती अहेरी यांचेकडे निवेदनाद्वारे देण्यात आले.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना जिल्हा शाखा गडचिरोली द्वारे वारंवार ग्राम रोजगार सेवकांचे प्रलंबीत समस्या चे विषयी घेऊन निवेदणाद्वारे अवगत केले असून सुद्धा ग्राम रोजगार सेवक यांचे मागण्या सोडविल्या गेल्या नाही.समोर दिवाळी सन असून आर्थिक विवंचनेमुळे दिवाळी सण कसा साजरा करायचं असा प्रश्न अहेरी तालुक्यातील ग्राम रोजगार सेवकांना भेडसावत आहे.
नुकतेच झालेल्या ग्राम समृद्धी तीन दिवशीय प्रशिक्षणासाठी शंभर टक्के उपस्थिती दर्शवून प्रशासनाला सहकार्य केले.
मी समृद्ध तर गाव समृद्ध,गाव समृद्ध तर मी समृद्ध,पर्यायाने माझा महाराष्ट्र समृद्ध ही संकल्पना ग्राम रोजगार सेवका शिवाय पूर्ण होत नाही,ग्राम रोजगार सेवक समृद्ध झाला नाही तर गाव समृद्ध कसा होईल असा प्रश्न ग्राम रोजगार सेवाकांनी प्रशासनाला करीत आहेत.
समृद्धीच्या दृष्टीने ग्राम रोजगार सेवाकांच्या समस्या हे महत्वाचे असून ग्राम रोजगार सेवाकांचे एक प्रकारे खच्चीकरण केल्या जात आहे.ग्राम रोजगार सेवाकांचे प्रलंबित समस्या ग्राम रोजगार सेवक यांचे पाच वर्षापासून प्रवास व अल्पोहार भत्ता देण्यात यावे,०.५०% प्रशासकीय खर्च देण्यात यावा,प्रलंबित प्रोत्साहन भत्ता देण्यात यावे, ह्या समस्या घेऊन वारंवार निवेदन देऊन ही समस्या न सुटल्यामुळे ग्राम रोजगार सेवक संघटना अहेरी कडून दि.११ आक्टोबर पासून संपूर्ण तालुक्यात काम बंद आंदोलन करण्याचा गट विकास अधिकारी पंचायत समिती अहेरी यांच्याकडे निवेदनाद्वारे ईशारा देण्यात आले आहे.
सदर निवेदन देताना ग्राम रोजगार सेवक संघटना अहेरी चे अध्यक्ष मुक्तेश्वर गंगाधरिवार,सचिव माणिक दुर्गे, उपाध्यक्ष बंडू आत्राम, सहसचिव आनंद दुर्गे, संघटनेचे ग्राम रोजगार सेवक सदस्य दिलीप राऊत,संतोष तलांडी, रमेश बामनकर, अनिल आत्राम, श्रीनिवास रेपाकवार, विकास मंडल, नामदेव पेंदाम, नितीन मोतकूरवार, संजय भोयर, रमेश पोरतेट आदी रोजगार सेवक उपस्थित होते.







