*आमदार कृष्णा गजबे यांच्या प्रमुख उपस्थितीत चेक सुपूर्द.*
अहेरी :देसाईगंज तालुक्यातील चोप येथील युवक दिनांक 3 मे ला स्व.अजित सोमेश्वर नाकाडे वाघाच्या हल्ल्यात ठार झाला, आज आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांच्या हस्ते वन विभागाकडून 5 लक्ष रुपयांचा चेक स्व, अजित सोमेश्वर नाकाडे परिवाराला सुपूर्द करण्यात आला.
या प्रसंगी वनपरिक्षेत्र अधिकारी विजय धांडे, ct 1 वाघांना बेशुद्ध करून पकडण्यात मुख्य भूमिका बजावणारे डाँक्टर खोब्रागडे, शूटर मराठे ,नितीन लाडे सरपंच, गौरव नागपूरकर, आत्मराम सुर्यवंशी, सोमेश्वर नाकाडे,अशोक नाकाडे, त्रेम्बक भजने, शुभम नागपूरकर शेखर कुथे , वनरक्षक संदीप कानकाटे, सुनील कांबळे, उपस्थित होते.