आर्वी तालुक्यातील ग्रामपंचायत निकालांमध्ये 5 ठिकाणी काँग्रेस दोन ठिकाणी बीजेपी ने पक्षाने बाजी मारली

43

मांडला ,हैबतपूर( वाठोडा) सर्कसपूर व पिपरी,अहिरवाडा येथे काँग्रेसचे तर  नेरी ,जाम येथे भारतीय जनता पक्षाचेसरपंच पदाकरता उमेदवार निवडून आले
      
      सर्कसपूर -सरपंच गजानन हनवते ( कांग्रेस),5सदस्य काँग्रेस2 भाजपा,  मांडला -सरपंच सुरेंद्र धुर्वे( कॉग्रेस),7 ही सदस्य काँग्रेस , पिपंरी -सरपंच रज्जाक अली(कॉग्रेस) सदस्य 5काँग्रेस  2 भाजपा, हैबतपूर (वाठोडा) -सरपंच सचिन पाटील( कॉग्रेस),सदस्य 6काँग्रेस 1 भाजपा,मिर्झापुर नेरी ग्रामपंचायत सरपंच बाळा सोनटक्के,( भाजपा) 7 ही सदस्य 7  भाजप  विजयी,जाम सरपंच राजकुमार मनोरे (भाजपा) , सदस्य 3 भाजपा, 4 कांग्रेस, अहिरवाडा सरपंच विना वलके  (कांग्रेस ) सदस्य4 कांग्रेस, 3 सदस्य भाजपा  उमेदवार विजयी झाले
   
 तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये माजी आमदार अमर काळे गटाने 5 ग्रामपंचायती वर सरपंचासह निर्विवाद बहुमत प्राप्त करून  पुढे होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीपूर्वी भाजपला मोठा धक्का दिला आहे
 उपविभागीय हरीश धार्मिक तहसीलदार विद्यासागर चव्हाण यांच्या मार्गदर्शनात निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नायब तहसीलदार विनायक मगर, श्रीमती स्मिता माने ,श्रीमती उज्वला उईके यांनी काम पाहिले
अहिरवाडा येथे निवडून आलेल्या सरपंच उमेदवार आमचाच आहे असा दोन्ही पक्ष दावा करीत आहे