आरेंदा ग्रामपंचायत मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा..

39

अहेरी तालुका मधील आरेंदा ग्रामपंचायतीचे सार्वत्रिक निवडणुक हे अहेरी विधान सभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार श्री धर्मराव बाब आत्राम साहेब यांच्या मार्गदर्शानाखाली आणि माजी जिल्हापरिषद अध्यक्ष सौ भाग्यश्री ताई आत्राम ( हलगेकर )  व राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे प्रदेश उपाध्यक्ष श्री ऋतुराज हलगेकर यांच्या नेतृत्वात आरेंदा आणि खांदला ग्रामपंचायतीचे सार्वत्रिक निवडणुक लढविण्यात आले होते.
     यामध्ये आरेंदा ग्रामपंचायत निवडणुकीत थेट सरपंच म्हणून श्री व्यंकटेश पेडू तलांडी आणि सदस्य म्हणून श्री मुरा आत्राम, श्री रामजी कुळमेथे, सौ. बुजी आत्राम, सौ. रत्ती तलांडी, कू. जाई आत्राम, कू. लिम्मी गावडे इत्यादींनी बहुमताने निवडून आले.
        तसेच खांदला  ग्रामपंचायत निवडणुकीत सदस्य म्हणून श्री नारायण आत्राम, श्री राकेश सिडाम, सौ. अरुणा सडमेक, सौ. वाणी आंबलीलपवार इत्यादींनी बहुमताने निवडून आले.
           यावेळी निवडणुक प्रचारात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनेक कार्यकर्ते मेहनत घेतले