अहेरी विधानसभा क्षेत्रातील शेतकऱ्यान कडे बहुतांश भागात मोबाईल नेटवर्क सुविधा नसल्यामुळे दुर्गम भागातील शेतकरी लोकांना मोबाईल प्रणालीद्वारा ई-पिक पाहणीची माहिती देणे अशक्य आहे. तसेच या भागातील बहुतेक शेतकरी हे अशिक्षित असून त्यांचेकडे मोबाईल सुद्धा नाही. परिणामी पिकाची वास्तविक स्थिती दर्शविल्या जाऊ शकत नाही. व या भागातील शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होईल. त्याकरीता अहेरी विधानसभा क्षेत्राकरिता ई पिक पाहणी हि तलाठी login ला जोळण्यात यावे, किंवा ऑफलाईन पद्धतीने तलठ्यांकडून पिकाची नोंद घेण्यात यावी असे मा. आमदार धर्म राव बाबा यांनी जिल्हाधिकारी गडचिरोली यांचेकडे मागणी केली होती. ती मागणी मान्य करून जिल्हाधिकारी साहेबांनी संबंधित तहसीलदारांना यापुढे पीक नोंदी ऑफलाईन पद्धतीने घेण्याची सूचना दिली आहे.
माननीय बाबांनी अहेरी विधान सभा क्षेत्रातील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेण्याचे आव्हान केले आहे.
तसेच वनहक्क अंतर्गत वाटप पट्टया चे 7/12 मालकी सदरावर वन सरकार असे नमूद केले असल्याने पिकाचे नोंदी घेण्यास अडचण निर्माण होत आहे, त्याबाबतीत सुद्धा निर्देश देऊन पिकांची नोंद घेण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी सुध्दा माननीय आमदार धर्मराव बाबांनी केली असून या विषयी लवकरच मार्ग काढण्यात येईल असे जिल्हाधिकाऱ्यांनी आश्वासन दिले आहे.
आपन नेहमी शेतकऱ्यांच्या सोबतीला उभे असून असेच शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यास सदैव प्रयत्नशील राहू असे बाबांनी तमाम शेतकरी बांधवांना ग्वाही दिलेली आहे.