अहेरी तालुक्यातील पुसुकपल्ली गावातील आयुर्जल शुद्धजल केंद्राला मा.राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी दिली भेट.

57

मैत्री परिवार संस्था व नटराज निकेतन संस्था नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच माजी पालकमंत्री मा. राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या विशेष आर्थिक सहकार्याने अहेरी तालुक्यातील पुसूकपल्ली येथे गेल्या वर्षी नाविन्यपूर्ण आयुर्जल शुद्ध जल केंद्राचे लोकार्पण करण्यात आले होते, काल राजे साहेबांनी स्वतः गावात येवून संपूर्ण जल शुद्धीकरण केंद्राची पाहणी केली, तसेच गावकऱ्यांशी आस्थेने संवाद साधला, पुसुकपल्ली गावात दूषित पाण्यामुळे किडनी आजाराने अनेकांचा मृत्यू झाला होता ह्यामुळे ह्या जल शुद्धीकरण केंद्रांची गरज लक्षात घेऊन राजे साहेबांनी आर्थिक मदत केली होती, आज संपूर्ण गावकऱ्यांना ह्याचा लाभ होत आहे.