टीम एएमपी द्वारा राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षा २०२२ चे दिमाखदार आयोजन* *आ.सौ. सुलभाताई खोडके यांच्या हस्ते स्पर्धेचे पोस्टर प्रदर्शित

47

अमरावती ०१ नोव्हेंबर:  एसोसिएशन ऑफ़ मुस्लिम प्रोफेशनल (एएमपी) द्वारा आयोजित नेशनल टैलेंट सर्च २०२२ या दिमाखदार स्पर्धेचे  तीन टप्प्यात आयोजन करण्यात आले आहे. आ. सौ. सुलभाताई खोडके यांच्या हस्ते स्पर्धेचे  पोस्टर प्रदर्शित करण्यात आले. विद्यार्थ्यांना प्रतिभा संपन्न बनवून त्यांचा स्पर्धा परीक्षांकडे कल वाढविणाऱ्या या आयोजनाची आ.सौ. सुलभाताई खोडके यांनी प्रशंसा करीत शुभेच्छा दिल्या. तसेच सर्वच विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन सुद्धा आमदार महोदयांच्या वतीने करण्यात  करण्यात . याप्रसंगी यश खोडके , उर्दू टीचर्स असोशिएशन चे  विभागीय अध्यक्ष  गाज़ी ज़हेरोश, अमरावती एएमपी प्रमुख इंजिनियर परवेज़ अली, सेक्रेट्री इंजिनियर आमिर सोहेल, इंजिनियर अब्दुल फहीम, इंजिनियर राजिक सर, सलमान खान,राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे शहराध्यक्ष अध्यक्ष ऋतू राज राऊत ,सय्यद नाशित आदी उपस्थित होते .  
एसोसिएशन ऑफ़ मुस्लिम प्रोफेशनल अर्थात एएमपी ला  तिसऱ्यांदा राष्ट्रीय प्रज्ञा शोध स्पर्धेच्या आयोजनाचा मान मिळाला आहे.   विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणिवा तसेच  स्पर्धा परीक्षेची भावना  वाढीस लागावी , या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सदरची परीक्षा निशुल्क असून यावर्षी पाच हजार हुन अधिक शाळा , पंधराशे हुन अधिक महाविद्याविद्यालय तसेच संपूर्ण भारतातून १ लाखाहून अधिक विद्यार्थी यामध्ये सहभागी होणार आहे.  विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्याला घेऊन  एएमपीच्या वतीने ५ लाखाहून अधिक  रोख पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे.  तसेच शीर्षस्थानी असलेल्या दोन हजार विद्यार्थ्यांना आयआयटी , जेईई , नीट , सारख्या  शिकवणी करिता  शिष्यवृत्ती देण्यात येईल . आयोजनात सहभागी प्रशिक्षण संस्थांकडून सदरची शिष्यवृत्ती ही ५०%- ते १००% पर्यंतदेण्यात येईल . सोबतच जकात आधारित क्राउड फंडिंग  प्लेटफार्म  IndiaZakat.comच्या माध्यमातून  पात्रताधारक विद्यार्थ्यांना  २० लाखाहून अधिक शैक्षणिक शिष्यवृत्तीदेण्यासह त्यांना शिक्षणासाठी आवश्यक सहकार्य करण्यात येईल . 
राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षातीन श्रेणी मध्ये होणार असून ज्यामध्ये वरिष्ठ स्तर / स्नातक पदवी अथवा पदविकाधारक : – रविवार, १३ नोव्हेंबर २०२२ ला तर
कनिष्ठ महाविद्यालय ( ११ वी व बारावी साठी )  रविवार, २० नोव्हेंबर २०२२  ला तसेच शाळा स्तर :- इयत्ता आठवी , नववी व दहावी : –  रविवार,२७ नोव्हेंबर २०२२ ला परीक्षा घेण्यात येणार आहे. या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे  शाळा , महाविद्यालय,  एनआईओएस, आईटीआई, पदविका  आदी विद्यार्थ्यांबरोबरच मदरसा येथील  १३ ते १५ वर्ष वयाच्या  विद्यार्थ्यांना सुद्धा सहभाग घेता येणार आहे.  
राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा २०२२ च्या नोंदणी करिता  एएमपी वर्ल्ड  नामक मोबाईल अँप विकसित करण्यात आला आहे. ज्यावर एनटीएस २०२२  परीक्षेसंदर्भात  माहिती उपलब्ध करून देण्यात  आली आहे.  तसेच  www.ampindia.org/National_talent_search वर नोंदणी व माहिती ची सुविधा उपलब्ध आहे.  सोबतच विद्यार्थ्यांना आवश्यक मदत व सुविधेकरिता  एएमपी अमरावती द्वारा हेल्पलाईन क्रमांक  ९०९६१९७६७६ , किंवा ९३०७१०२५२१ कार्यान्वित करण्यात आले आहे.  तेव्हा विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त संख्येने या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन एसोसिएशन ऑफ़ मुस्लिम प्रोफेशनल  च्या वतीने करण्यात आले आहे.