बोरमपल्ली येथे एक कृषी रोहीत्र (ट्रान्सफाॅर्मर) जळुन निकामी झाले होते. त्यामुळे त्यावर अवलंबुन असलेल्या शेतकर्यांचे शेकडो एकर जमीनीवरील ऊभी पिके करपुन जात होती.सर्व शेतकरी हवालदिल झाले होते .हाती आलेले पीक नष्ट होण्याची परिस्थिती झाल्याने तोंडचे घास निघुन जाण्याची भिती निर्माण झाली.सुचेनासे झाल्याने शेवटी सर्व शेतकर्यांनी आपली व्यथा माजी पालकमंत्री राजे अम्ब्रीशराव महाराजांना सांगीतली.राजे साहेबांनी फोन लावुन अधिकार्यांना ताकीद देताच त्याठिकाणी लगेच नवे रोहीत्र पाठविण्यात आले.विज पुरवठा सुरळीत होवून पिकांना नियमीत पाणी पुरवठा झाल्याने शेतकरी आनंदीत झाले आणि सर्वांनी राजेसाहेबांचे आभार मानले व राजे साहेबांची कार्यक्षमता पुन्हा अधोरेखीत झाली.
Home Breaking News राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या सुचनेमुळे बामणी- बोरमपल्ली येथे तात्काळ विद्युत रोहीत्र (ट्रांसफार्मर)...







