अखेर आलापल्ली वअहेरी ‘त्या’ वस्तीगृहांचे दार उघडले

46

.धर्मराव बाबा आत्राम यांचा पुढाकार,विद्यार्थ्यांना दिलासा

अहेरी:-तालुक्यातील आलापल्ली आणि अहेरी येथील शासकीय आदिवासी मुलांचे वस्तीगृह बंद असल्याने या वस्तीगृहातुन शिक्षण घेणाऱ्या आदिवासी विध्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहण्याची वेळ आली होती.विद्यार्थ्यांनी अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार धर्मराव बाबा आत्राम यांच्याकडे ही गंभीर समस्या मांडली होती.त्यांनी लगेच आदिवासी विकास मंत्री डॉ विजयकुमार गावित यांच्याशी चर्चा करून त्वरित वस्तीगृह सुरू करण्याची मागणी केली.आ धर्मराव बाबा आत्राम यांच्या प्रयत्नाने अखेर बंद असलेल्या वस्तीगृहांचे दार खुले झाले आहे.

एकीकडे गेल्या दोन ते तीन वर्षापासून ग्रामीण,आदिवासी व अतिदुर्गम भागात कोरोनामुळे शिक्षणाचे पुरते नुकसान झाले आहे. कोविड मुळे संपूर्ण राज्यातील शाळा महाविद्यालय बंद होती. त्यादरम्यान विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून ऑनलाइन पद्धतीने अध्ययन केले जात होते. मात्र, ग्रामीण, आदिवासी व अतिदुर्गम भागात ऑनलाईन अध्ययन पद्धती हवी तशी प्रभावी ठरली नाही.अहेरी उपविभागातील अनेक आदिवासी विद्यार्थी शिक्षणासाठी अहेरी, आलापल्ली शहरात येतात. अशा विद्यार्थ्यांना राहण्यासाठी आदिवासी विकास विभागअंतर्गत निवारा मिळून शांततापूर्ण वातावरणात शिक्षण घेता यावे याकरिता शासकीय आदिवासी वस्तीगृह चालविली जातात. मात्र, शाळा, महाविद्यालय सुरू होऊही वसतिगृह चालू न झाल्याने ग्रामीण, आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडत होता.

मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत असल्याने विद्यार्थ्यांनी तातडीने शासकीय वस्तीग्रह सुरू करण्याची मागणी आमदार आत्राम यांच्याकडे रेठुन धरली होती.अखेर आ धर्मराव बाबा आत्राम यांच्या प्रयत्नांने आलापल्ली आणि अहेरी येथील दोन्ही शासकीय आदिवासी मुलांचे वस्तीगृह सुरू झाले असून विध्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.आता हळूहळू विध्यार्थी या वस्तीगृहात दाखल होत आहेत.

भाग्यश्री आत्राम यांनी जाणून घेतल्या समस्या
  केवळ भोजन पुरविणारे कंत्राटदार समोर येत नसल्याच्या कारणाने जर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असेल तर ठीक नाही.आता नियमित वस्तीगृह सुरू झाले असून विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही याची काळजी संबंधित विभागाने घ्यावी. त्याअनुषंगाने वस्तीगृहाला भेट देऊन विध्यार्थ्यांशी चर्चा करण्यात आली.यानंतर पुन्हा समस्या निर्माण झाल्यास आपण सदैव विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे राहणार असल्याचे भाग्यश्रीताई आत्राम यांनी म्हटले आहे.