इंदाराम :आज दिनांक 26 नोव्हेंबर 2022 कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय इंदिराम येथे संविधान दिनाचे औचित्य साधून ‘ज्ञानदा प्रश्नमंजुषा स्पर्धा’ घेण्यात आली. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे तसेच परीक्षक म्हणून पुढील मान्यवर लाभले
1) श्री के.डी. मुंजमकर मुख्याध्यापक जिल्हा परिषद इंदाराम तथा केंद्रप्रमुख केंद्र देवलमरी
2)श्री. ताराचंद भुरसे विषयतज्ञ गटसाधन केंद्र अहेरी
3)श्री.ज्ञानेश्वर कापगते विषयतज्ञ गटसाधन केंद्र अहेरी
4)श्री किशोर मेश्राम विषयतज्ञ गट साधन केंद्र अहेरी इत्यादी मान्यवर लाभले. प्रश्नमंजुषा मधील विचारण्यात आलेल्या प्रश्नातून स्पर्धा परीक्षेचा प्रवास किती खडतर असतो.हे सांगणारी ही एक स्पर्धा होती स्पर्धा परीक्षेचे वातावरण निर्माण करण्यासाठी हा एक छोटासा प्रयत्न. सर्व विद्यार्थिनींनी चांगला प्रतिसाद दिला. ध्येयाच्या दिशेने वाटचाल करण्याकरिता शुभेच्छा देण्यात आल्या. शाळेचे मुख्याध्यापिका कु डी वाय ढवस यांच्या प्रेरणेने ही स्पर्धा पार पडली. या कार्यक्रमाला समस्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते