पोउपनि संतोष जायभाये प्रभारी अधिकारी पोमके
मरपल्ली: हे पेट्रोलिंग करीत असतांना ज्ञहद्दीतील भस्वापूर येथील जि. प. प्रशाला, भस्वापूर परिसरात गवत वाढलेले, ब-याच दिवसापासून शाळेला रंग नसल्याने काळ्या झालेल्या भिंती व लाईट नसुन जीर्ण झालेली वायरिंग व मोडकळीस आलेला पंखा अशी शाळेची अवस्था दिसली..
*सदर गाव हे गडचिरोली जिल्हा पोलीस दलातर्फे राबविण्यात येत असलेल्या दत्तक गांव योजनेतील पोमके मरपल्ली चे दत्तक गाव*
त्यानंतर मा. निलोत्पल सा. पोलीस अधीक्षक गडचिरोली, मा. अनुज तारे सा. अपर पोलीस अधीक्षक गडचिरोली, मा. कुमार चिंता सा. , अपर पोलीस अधीक्षक,मा. यतीन देशमुख सा. अपर पोलीस अधीक्षक गडचिरोली यांचे प्रेरणेतून व मा. सुजीतकुमार क्षिरसागर सा. उपविभागीय पोलीस अधिकारी, जिमलगट्टा यांचे मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी पोउपनि संतोष जायभाये तसेच गडचिरोली जिल्हा पोलीस अंमलदार व रा. रा. पो. बल गट 7 दौंड यांचे अंमलदार यांचे सहकार्याने चुना, गेरू, ब्रश, ऑईल पेंट विकत आणले व पोमके ला उपलब्ध असलेले पंखा, लाईट व इतर इलेक्ट्रॉनिक साहित्य घेतले. त्यानंतर जिल्हा पोलीस अंमलदार, SRPF गट 7 दौंड चे अंमलदार व अरुण वेलादी सरपंच, ग्रां.पं. मरपल्ली व भस्वापूर क्रिकेट टीम चे सर्व खेळाडू यांचे श्रमदानाने परीसरात गवत काढून सर्व कचरा काढून परीसर स्वच्छ केला. त्यानंतर शाळेला पुर्ण पणे रंग रंगोटी करून दिली..
जि. पो. अंमलदार माणिक कोवाची, विशाल गुरनूले, अंकुश ठाकरे व SRPF अंमलदार सचिन दराडे यांनी 10 वर्षापासून बंद असलेली जीर्ण झालेली वायरिंग पूर्णपणे बदलुन नवीन लाईट व पंखा लावण्याच्या कामात मोलाचे सहकार्य केले..
आज शाळेचा परिसर एकदम स्वच्छ असून शाळेला पूर्ण रंगरंगोटी आहे. विशेष म्हणजे 10 वर्षापासून लाईट नसलेल्या शाळेत लाईट असुन मोडकळीस आलेल्या पंख्याऐवजी नवीन चालू स्थितीत पंखा आहे..तरी शाळेच्या परिसरात शैक्षणिक वातावरण निर्माण होण्यास मदत झाली.. स्वच्छ व रंग देवून नवीन झालेली शाळा तसेच पंखा सुरू झाल्याने विदयार्थ्यांच्या चेह-यावर आनंद मावत नव्हता..
सरपंच अरुण वेलादी, सर्व नागरिक ग्राम भस्वापूर व शाळेतील शिक्षिका श्रीमती डंबारे मॅडम यांनी गडचिरोली जिल्हा पोलीस दलाचे आभार मानले..