बोरी केंद्रात गडचिरोलीचे मुख्यकार्यकारी कुमार आशिर्वाद यांचे संकल्पनेतून फुलोरा अॅप प्राशिक्षणाचे आयोजन

42

 बोरी:जिल्हा परिषद गडचिरोलीचे मुख्यकार्यकारी कुमार आशिर्वाद यांचे संकल्पनेतून मागील दोन वर्षांपासून फुलोरा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाची ॲप निर्माण करुन त्यात विद्यार्थ्यीची माहिती ष कशी भरायची याबाबतचे प्रशिक्षण जिल्हा स्तरावर घेण्यात आले होते .आता हेच प्रशिक्षण केंद्रस्तरावर जिल्ह्या परिषदेच्या  सर्व शाळातील शिक्षकांना देण्यात येत आहे.बोरी केंद्राचे प्रभारी क्रेद्र प्रमुख लक्ष्मीनारायण येरकलवार यांचे मार्गदर्शनाखाली केंद्रातील सर्व मुख्याध्यापक,पदवीधर व विषय शिक्षकासह सर्व प्राथमिक शिक्षकांसाठी आयोजित करण्यात आले होते.प्रत्येक मुलांने श्रेणीबध्द अभ्यासक्रम आणी उपक्रमामध्ये प्रवेश करण्यापूर्वीच पायाभूत साक्षरता अंक विकसीत करण्यावर फुलोरा उपक्रमात लक्ष केंद्रित केले आहे.प्रत्येक शाळेची प्रत्येक विद्यार्थ्यांची माहिती या ॲप मध्ये सामाविष्ट केल्या जाणार आहे.शिक्षण तज्ज्ञांकडून बालकांचे कौशल्य मॅपींग व मार्गदर्शन मुलांची प्रगती व शाळेची एकुण कामगीरी याचा आढावा घेण्यास मदत होईल वेळ व शक्ती वाचेल विद्यार्थ्यांचा निकाल वेळेवर लागेल. शिक्षक,तज्ञ व पर्यवेक्षक यंत्रणेला अचुक माहिती भरता,येवुन ती एका क्लिकवर बघता येईल ही सर्व माहिती फुलोरा ॲप मध्ये सामाविष्ट केली जात असल्याने याचा फायदा सर्वानाच होईल. या प्रशिक्षणाचे तज्ञ सुलभक म्हणून दिगांबर दुर्गे व प्रभारी केंद्र प्रमुख लक्ष्मीनारायण येरकलवार यांनी पीपीटीचा उपयोग करुन दिलेत.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक राजु आत्राम यांनी केले.संचालन संतोष नलगुंटा तर उपस्थितांचे आभार रविंद्र येमसलवार यांनी मानले.या प्रशिक्षणाचा लाभ केंद्रातील पंचेचाळीस शिक्षकांनी घेतला.