आदिवासी समाज हा सामाजिक बांधिलकी

55

पेरमिली:- आजवरच्या इतिहासात आदिवासी समाजातल्या प्रमाणिकेतवर कोणीही शंका उपस्थित करू शकले नाही,हेच आपल्या या समाजाचे प्रमाणिकतेचे प्रमाण असून आपल्या हा समाज सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्यां मधला समाज असल्याचे प्रतिपादन आदिवासी विद्यार्थी संघाचे नेते व माजी आमदार दिपक दादा आत्राम यांनी केले. 
ते पेरमिली येथे आयोजित आदिवासी समाज बांधवांच्या दसरा पंडुम व गडी पूजा कार्यक्रमात बोलत होते .
        या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आविस नेते व माजी जि.प. अध्यक्ष अजय कंकडालवार, कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माजी जि.प.अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम पेरमिलीचे सरपंच किरण कोरेत,माजी पं.स. सदस्य रामेश्वर बाबा आत्राम,गडी सेंडीया पेरमिली पट्टी संजय सडमेक,गडी भूमिया पेरमिली पट्टी बोड्डाजी गावडे,माजी सरपंच प्रमोद आत्राम,वासुदेव कोडापे, बंडू आत्राम,साजन गावडे,मेडपल्ली सरपंच निलेश वेलादी,सूरज आत्राम,उपसरपंच दलसू आत्राम,माजी सरपंच बालाजी  गावडे तसेच पेरमिली पट्टीतील सर्व सरपंच तसेच पट्टीतील भूमिया,गायता,पेरमा,वड्डे मोठया संख्येने उपस्थित होते.
               कार्यक्रमाची सुरुवात आदिवासी देवी देवतांची विधिवत पूजा अर्चा करून करून करण्यात आली.
    या कार्यक्रमात माजी जि.प.अध्यक्ष भाग्यश्री ताई आत्राम ,आविस नेते व माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार सह अनेक मान्यवरांनी समाजाप्रती बहुमूल्य मार्गदर्शन केले.
         पेरमिली येथे आयोजित कार्यक्रमाला या पट्टीतील  नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.