गुड्डीगुडम येथील प्रौढांचे व्हॉलीबॉल सामन्याचे माजी आमदार दिपक दादा आत्राम यांच्या हस्ते उदघाटन

45

विसं नेते व माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांची प्रमुख उपस्थिती

      गुड्डीगुडम:  अहेरीतालुक्यातील गुड्डीगुडम येथे जयशिवाजी स्पोर्टिंग क्लब कडून प्रौढांसाठी भव्य व्हॉलीबॉल सामन्याचे आयोजन करण्यात आले.
              या सामन्याचे उदघाटन आदिवासी विद्यार्थी संघाचे नेते व अहेरीचे माजी आमदार दिपक दादा आत्राम यांच्या हस्ते करण्यात आले.
             या प्रौढांचे व्हॉलीबॉल सामन्याचे उदघाटन समारंभ कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून आविसचे युवा नेते व माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी जि.प.सदस्य सुनिताताई कुसनाके,तिमरम ग्राम पंचायतचे सरपंच सरोजाताई पेंदाम, ग्रा.पं. उपसरपंच प्रफुल नागुलवार,माजी प.स.सभापती भाष्कर तलांडे,उपसरपंच देवलमरी हरीश गावडे,उपसरपंच उमेश मोहूर्ले,माजी सरपंच महेश मडावी,माजी सरपंच विजय कुसनाके,नगरसेवक प्रशांत गोडशेलवार,माजी सरपंच गुलाबराव सोयम,माजी उपसरपंच संजय पोरतेट, माजी उपसरपंच शशिकला पेंदाम,माजी सरपंच वसंत सिडाम,जयराम सिडाम,अशोक सिडाम,बापू सावकार गांगरेड्डीवार,जुलेख शेख,प्रवीण रेषे,सुधाकर आत्राम,पत्रकार उमेश पेंडाला आदी मान्यवर उपस्थित होते.

               यावेळी उपस्थित खेळाडू,क्रीडाप्रेमी व नागरिकांना माजी आमदार दिपकदादा आत्राम यांनी उदघाटनिय व माजी जि.प.अध्यक्ष कंकडालवार यांनी अध्यक्षीय भाषणातून व्हॉलीबॉल खेळाविषयी मोलाचे मार्गदर्शन केले.                
             या सामन्यासाठी प्रथम पुरस्कार माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्याकडून एकतीस हजार रु रोख तर द्वितीय पुरस्कार माजी आमदार दिपक दादा आत्राम यांच्याकडून एकेविस हजार रु रोख व तिसरा पुरस्कार अकरा हजार रु.तिमराम ग्राम पंचायत कडून ठेवल्यात आले.सोबतच मान्यवरांकडून आकर्षक पुरस्कारही ठेवण्यात आले.
             प्रौढांचे व्हॉलीबॉल सामन्याचे  उदघाटनिय सोहळ्याचे संचालन व आभार रमेश बामनकर यांनी मानले.उदघाटनिय सोहळ्याचे यशस्वी आयोजनासाठी जयशिवाजी स्पोर्टिंग क्लबचे सर्व पदाधिकारी व सदस्य मंडळांनी अथक परिश्रम घेतले.