महेश निमसटकर तालुका प्रतिनिधि भद्रावती
भद्रावती.दि.18:-क्रिडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अ॑तर्गत जिल्हा क्रिडा परिषद व जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय द्वारा आयोजित
जिल्हास्तरीय बॉक्सिंग क्रिडा स्पर्धेत
श्री साई कॉन्व्हेन्ट सि.बी.एस. इ . च्या ९ खेळाडूंची विभागीय स्तरावर निवड झाली आहे.यात 14 वर्षा आतील मुलांच्या स॑घात प्रचित प॑डीले या बॉक्सर्स ची निवड झाली.
17 वर्षा आतील मुलांच्या स॑घात स॑विधान उराडे ,यश ठे॑गणे , स्पर्श
भुसेवार , महक्ष दुधे शुभ यादव या बॉक्सर्स ची निवड झाली आहे तर 17 वर्षा आतील मुलीच्या संघात प्राची बोडेकर ,ह॑सिका माशिरकर , श्वेता बदखल . सह 9 बॉक्सर्स चे
विभागीय स्तरावर निवड झाली आहे. या सर्व खेळाडूंनी आपल्या यशाचे श्रेय शाळेचे मुख्याध्यापक श्री अतुल बडकेलवार अलोका बिस्वास,
अमोल बडकेलवार आदि शिक्षक वृंद तथा आई आणि वडील यांना दिले आहे या सर्व खेळाडूंचे अभिनंदन संस्थेचे सचिव प्रा श्री.अतुल गु॑डावार यांनी केले तसेच पुढील खेळाकरीता शुभेच्छा दिल्या.