क्रिकेटच्या मैदानावरून प्रत्येक खेळाडूला आपले नैपुण्य दाखवता येते

41

माजी आमदार दिपक दादा आत्राम यांचे प्रतिपादन

  नागेपल्ली….इंग्लंडमधून सुरुवात झालेली क्रिकेट हा खेळ आज भारतासह आशिया खंडातच सर्वात लोकप्रिय खेळ ठरलेला आहे. गल्लीबोळापासून तर विश्वचषकांपर्यंत क्रिकेटची लोकप्रियता आहे. हॉकी व फूटबॉल नंतर जगभरात सर्वात पसंतीची मैदानी खेळ म्हणजे क्रिकेट असून या मैदानी खेळातून क्रिकेट संघाचे गोलंदाजी,फलंदाजी व क्षेत्ररक्षण करणाऱ्या या सर्व खेळाडूंना आपले नैपुण्य दाखवता येते,असे प्रतिपादन आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय अध्यक्ष व अहेरीचे माजी आमदार दिपक दादा आत्राम यांनी केले.

        ते अहेरी तालुक्यातील नागेपल्ली येथे यंगस्टार क्रिकेट क्लब कडून आयोजित टेनिस बॉल 30 यार्ड दिवसकालीन क्रिकेट सामन्याचे उदघाटन प्रसंगी बोलत होते.

          या क्रिकेट सामन्याचे उदघाटन सोहळ्याला अध्यक्ष म्हणून आविसचे युवा नेते व गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार तर प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच लक्ष्मण कोडापे,उपसरपंच रमेश शानगोंडावार, आविस सल्लागार अशोक रापेल्लीवार,ग्राम पंचायत सदस्य फेलीक्स गिद्ध,आशिष पाटील, करिष्मा आत्राम,लक्ष्मी सिडाम,आविस सल्लागार विशाल रापेल्लीवार,माजी सरपंच विजय कुसनाके,जुलेख शेख,किशोर दुर्गे,संदीप बडगे आदी मान्यवर उपस्थित होते.

          यावेळी माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी  उपस्थित खेळाडूंना क्रिडा विषयी बहुमूल्य मार्गदर्शन केले.

               या सामन्यासाठी प्रथम पुरस्कार आविसचे युवा नेते अजयभाऊ कंकडालवार यांच्याकडून एकेविस हजार रु.रोख तर द्वितीय पुरस्कार माजी आमदार दिपक दादा आत्राम यांच्याकडून पंधरा हजार रु.रोख असून अनेक मान्यवरांकडून वयक्तिक आकर्षक पुरस्कारही ठेवण्यात आले. टेनिस बॉल क्रिकेट सामन्याचे उदघाटन सोहळा खेळीमय वातावरणात पार पडले उदघाटन सोहळा यशस्वीतेसाठी यंगस्टार क्रिकेट क्लबचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.उदघाटन सोहळ्याला गावकऱ्यांची उपस्थिती लक्षणीय होती.