भगवान बिरसा मुंडा हे आमच्यासाठी व येणाऱ्या पिढ्यांसाठी अमर आणि आदर्श आहेत

42

माजी आमदार दिपक दादा आत्राम यांचे प्रतिपादन

   कसनसुर:.क्रांतिकारी,स्वातंत्र्य सेनानी,आपल्या परिक्रमाने साहसी इतिहास रचणारे,मातृशक्तीसाठी प्राणाची आहुती देणारे भगतसिंग,राजगुरू,सुखदेव आणि चंद्रशेखर आझाद यांच्या पाऊलावर पाऊलं ठेऊन आदिवासी आणि सर्वसामान्य समाजाला ब्रिटिश राजवटी विरुद्ध जागृत करून आदिवासी समाजासाठी आपल्या जीवाची बाजी लावून ब्रिटिश राजवटी विरुद्ध उठाव करून तरुण वयातच  शहीद झालेले झारखंडचे महान सुपुत्र भगवान बिरसा मुंडा हे आमच्यासाठी व येणाऱ्या पिढ्यांसाठी अमर आणि आदर्श राहील,असे प्रतिपादन आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय अध्यक्ष व माजी आमदार दिपक दादा आत्राम यांनी केले.

                ते एटापल्ली तालुक्यातील कसनसुर येथे वेंनहारा इलाका पारंपारिक गोटूल समितीकडून आयोजित चंद्रपूर येथील लोकजागृती संस्थेनी प्रस्तुत केलेल्या *धरती आबा भगवान बिरसा मुंडा* या नाटकाचे उदघाटन प्रसंगी बोलत होते.

        या नाटकाचे उदघाटन समारंभाला अध्यक्ष म्हणून वेंनहारा इलाका अध्यक्ष सुधाकर गोटा, प्रमुख पाहुणे म्हणून कसनसुर ग्राम पंचयातचे सरपंच कमलताई हेडो, वैद्यकीय अधिकारी ब्रह्मनंद पुंगाटी, गाव भूमिया घिसाजी मडावी, पोलीस पाटील रैजी मडावी,माजी जि.प.सदस्य संजय चरडुके, बँक व्यवस्थापक सोनवणे, वेंनहारा इलाका सचिव राजू गोमाडी, आविस सल्लागार शंकर दासारवार,सुरेश तलांडे,कालिदास गेडाम,प्रकाश पुंगाती,बेबीताई हेडो, उपसरपंच छायाताई हिचामी,माजी सरपंच सुनील मडावी,प्रवीण मुंनरट्टीवार, मैनू लेकामी,सुरेश मट्टामी,सैनू मट्टामी,उमेश मेश्राम,आविस तालुका उपाध्यक्ष श्रीकांत चिप्पावार, जुलेख शेख आदी मान्यवर उपस्थित होते.

             पुढे बोलतांना आविस नेते व माजी आमदार आत्राम यांनी भगवान बिरसा मुंडा यांनी मातृभूमीच्या रक्षणासह आदिवासी समाजाच्या उत्थानासाठी आपले जीवन अर्पण केले.त्यांचा कार्याची तुलना करता येणार नाही.19 व्या शतकात त्यांनी ब्रिटिश राजवटी विरुद्ध उठाव करून भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासात त्यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावलयाचे ही त्यांनी म्हणाले.

           या नाटकाला नाट्यरसिकांसह गावकरी व आविसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.