माजी आमदार दिपक दादा आत्राम यांचे प्रतिपादन
नवेगाव:कबड्डी हा खेळ आज ग्रामीण स्तरापासून तर आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळला जात आहे.कबड्डी हा एक खेळ असून त्यामध्ये कुस्ती अन रग्बी सारखं खेळांचा मिश्रण असतो.कबड्डी खेळात दोन पक्षांमधील संघर्ष दिसतो.या खेळात सामर्थ्यवान अन बऱ्याच कार्यांचा संयोजन दिसतो. आज ग्रामीण आणि शहरी भागातील तरुणांमध्ये कबड्डीची आवडही निर्माण झाली असल्याने कबड्डी खेळणाऱ्या प्रत्येक खेळाडुनीं आपल्या भागामध्ये स्वतःची ओळख प्रस्थापित करण्याचं प्रयत्न करावे,असे प्रतिपादन आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय अध्यक्ष व माजी आमदार दिपक दादा आत्राम यांनी केले. ते अहेरी तालुक्यातील नवेगाव येथे जगदंबा कबड्डी क्लब कडून आयोजित खुले कबड्डी सामन्याचे उदघाटन प्रसंगी बोलत होते.या कबड्डी सामन्याचे उदघाटनीय सोहळा कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून आविसचे युवा नेते व माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार तर प्रमुख पाहुणे म्हणून उपसरपंच उमेशभाऊ मोहूर्ले, प्रतिष्ठित नागरिक मोहूर्ले पाटील,बंडुजी नागोसे,पोलीस पाटील प्रभाकर शेंडे,माळी समाजाचे अध्यक्ष विश्वनाथ गुरनुले, ग्राम पंचायत सदस्य अरविंद कन्नाके,हरिदास आत्राम,राजेश गाऊत्रे,मारोती ओडिंगनवार,उसेनजी निखुरे, भिकारू लोंबनले, मुख्याध्यापक दोंतुलवार, बाळापूर शाळेचे मुख्याध्यापक रेषे गुरुजी,लक्ष्मण जोडे,साईनाथ नागोसे,प्रवीण रेषे,माजी सरपंच विजय कुसनाके, जुलेख शेख आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून कबड्डी खेळाविषयी खेळाडूंना बहुमूल्य असे मार्गदर्शन केले. कबड्डी सामन्याचे उदघाटनीय सोहळ्याचे प्रास्ताविक व आभार उपसरपंच उमेशभाऊ मोहूर्ले यांनी मानले. यावेळी गावकरी,खेळाडू व क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्तीत होते.