नक्षल्यांनी पुन्हा झडकविले लोहखनिज विस्तार विरोधी ब्यानर

67

आमदार धर्मरावबाबा आत्राम यांचा दलाल म्हणून उल्लेख, 
एटापल्ली;
              तालुक्यातील सुरजागड लोहखनिज पहाडी परिसरात नक्षल्यांनी बांधलेल्या ब्यानरमधून आमदार धर्मरावबाबा आत्राम हे  लोहखनिज विस्ताराचे समर्थक व दलाल असल्याचा आमदार आत्राम यांचा आणखी एकदा उल्लेख केला आहे, त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे, 
              सुरजागड लोहखनिज पहाडी परिसरात पाच जानेवारी ते सात जानेवारी दरम्यान आदिवासींचे दैवत ओअदाल पेन, ठाकूर देवाच्या तीन दिवशीय यात्रा महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे, यावेळी गडचिरोलीसह चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, नागपूर, जिल्ह्यातून व लगतचे छत्तीसगड, तेलंगणा व आंध्रप्रदेश राज्यातून आदिवासी भाविक मोठ्या संख्येने यात्रेत सहभागी होतात,
          यात्रा महोत्सव सुरू झाल्याच्या पहिल्याच दिवशी चार जानेवारीच्या मध्यरात्री सुरजागड पहाडी परिसरात माडिया आदिवासी भाष्येत मजकूर लिहिलेले ब्यानर बांधून पुन्हा एकदा आमदार धर्मरावबाब आत्राम यांच्या जनविरोधी अजेंड्याचा ग्रामसभांकडून भांडफाड केला जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
           गेली एक ते दीड  वर्षापासून शांत असलेल्या नक्षली चळवळीने गेल्या दोन आठवड्यात प्रेसनोट प्रसारण, पोष्टर व ब्यानर झडकवत डोके वर काढले आहे, राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूरला सुरू होण्याच्या एक दिवस पूर्वीच  नक्षल्यांच्या पश्चिम सब जोनल ब्युरो गडचिरोलीचा प्रवक्ता श्रीनिवास याने सहीनिशी १८ डिसेंबर २०२२ ला प्रेस नोट प्रसारित करून आमदार धर्मरावबाबा आत्राम हे लॉयल्ड्स मेटल व त्रिवेणी अर्थमूव्हर्स कंपनीची दलाली करून आदिवासींच्या हक्काचा सुरजागड पहाड नेस्तनाभूत करत असल्याचे म्हटले होते,
          त्यामुळे नक्षल्यांकडून आमदार आत्राम यांच्या जीविताचा धोका लक्षात घेऊन राज्य शासनाने विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी  आमदार आत्राम यांना उच्च दर्जाची सुरक्षा प्रधान केली आहे, आमदार धर्मरावबाबा आत्राम यांच्या सुरक्षेत वाढ केल्याने चवथाळलेल्या नक्षल्यांनी लगेच ३१ डिसेंबर ला दुसरी प्रेस नोट प्रसारित करून आमदार धर्मरावबाबा आत्राम, माजी मंत्री अमरीश आत्राम व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री आत्राम या राजघराण्यांच्या आदिवासी नेतृत्वाचे वाभाडे काढुन गाव ग्रामसभांनी आत्राम राजघराण्याच्या पुढाऱ्यांना गावात प्रवेश करण्यास बंदी घालून हाकलून लावण्याचे आवाहन केले होते, 
            सदरचे ब्यानर सुरजागड  लोहखनिज उत्खनन पहाडीच्या पायथ्याशी बांधण्यात आले असून सुरजागड यात्रा महोत्सवावर  नक्षली दहशतीचे सावट पसरले आहे, ब्यानरमध्ये भाकपा ( माओवादी) असा शेवटी उल्लेख करण्यात आला आहे.