अहेरी :नगरपंचायत घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत ५५ सफाई कामगार कंत्राटी तत्त्वावर काम करतात परंतु गेल्या २ महिन्यापासून त्यांचे वेतन कंत्राटदाराने न दिल्याने त्यांच्यावर सद्या उपासमारीची वेळ आली आहे, ह्याबाबत भाजपाचे नगरसेवक अमोल गुडेल्लीवार यांनी मुख्याधिकारी सूरज जाधव यांना एक निवेदन देत सफाई कामगारांचे २ महिन्याचे थकीत वेतन त्वरित मिळवून देण्याची मागणी त्यांच्याकडे काही दिवसांपूर्वी केली होती.
भाजपा नगरसेवक अमोल गुडेल्लीवार यांनी ५ जानेवारी पर्यंत थकित वेतन न दिल्यास सफाई कामगारांना सोबत घेवुन बेमुदत कामबंद आंदोलन करू असा इशाराही त्या निवेदनातुन दिला होता, परंतु ५ जानेवारी पर्यंत सफाई कामगारांना २ महिन्यांचे थकीत वेतन कंत्राटदाराने न दिल्याने आज सकाळ पासून अहेरी शहरात कामबंद आंदोलनाला सुरुवात करण्यात आली असून शहरातील संपूर्ण कचरा संकलन आणि साफसफाई ठप्प झाल्याने सर्वत्र कचऱ्याचे ढीग साचल्याने जनतेची मोठी गैरसोय होत आहे, मागण्या तातडीने पूर्ण झाले नाही तर समोर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा ही सफाई कामगारांनी अहेरी नगरपंचायत प्रशासनाला दिला आहे.