शिवणीपाठ येथील चक्का जाम आंदोलनाला संदीप भाऊ कोरेत यांची भेट

44

आश्वासनाची पूर्तता १महिन्यात न केल्यास पिढीत शेतकऱ्यांना घेऊन मोठे जनआंदोलन उभारणार*

आलापली ते आष्टी या राष्ट्रीय महामार्गावर लोहखनिजच्या जड वाहणुकीमुडे शेत पिकांवर धूळ बसल्याने मौजा बोरी, राजपूर प्याच, रामपूर चेक, शिवणी पाठ, ओदिगुडम, ग्राम पंचायत खमण चेरू, ग्राम पंचायत महागाव अंटर्गत येणारी रस्त्यावरील गावातली शेतीमधील कापुस पीक नुकसान मोठया प्रमाणावर झालेले आहे त्याचे सर्व्ह सुधा करण्यात आलेले आहे, पण नुकसान भरपाई अजून पर्यंत मिळाली नाही म्हनून २/१/२३पासूनर८/१/२३साखळी उपोषण तहसील कार्यालय अहेरी येथे सुरु होते पण शासन व प्रशासन कडून कोणतेही मागण्या मान्य करण्यात आले नाही व कोणत्याही लोक प्रतिनिधी नी आमची भेट सुद्धा घेतली नाही त्यामूळे आता आमचा कोणीच वाली नाही असं समजून आम्ही सर्व पिढीत गावातली शेतकरी आता आमरण उपोषणाला १०/१/२३पासुन सुरु केले आहे व आज दिनाक १२/१/२३पासुनबोरी आलापल्ली महामार्गावरील शिवणी पाठ येथे बेमुदत चक्का जाम आंदोलन सुरु केले असता
त्या चक्का जाम आंदोलनाला प्रदेश सदस्य आदिवासी आघाडी महाराष्ट्र राज्य भाजपा युवा नेता संदीप भाऊ कोरेत यांनी भेट दिली असता प्रसाशन तर्फे नायब तहसीलदार यांनी एका महिन्याचा आत शेतकऱ्याचे नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन दिले असल्याची महिती दिली तेव्हा संदीप भाऊ नी आंदोलन कर्त्याना सागितले जर एका महिन्यात दिलेले आश्वासन पूर्ण करत नसेल तर तुम्हा सर्वा पिढीत शेतकऱ्यांना घेऊन मोठे जनआंदोलन उभारू या भस्मासुर कंपनीला सडो की पडो करुन सोडू व आपले मागण्या पूर्ण करून घेऊच तेव्हा भरपूर प्रमाणात पिढीत आंदोलक शेतकरी उपस्थीत होते